आशा
आशा
आशा निराशा हा ऊन सावलीचा
जसा चालतो जीवनात खेळ |
सुख दुःखाच्या आडव्या उभ्या
रेषांनी घातलेला जणू मेळ | |१| |
मनासारखे नाही पडत नेहमीच
जिवनाच्या सारीपटावर फासे |
आशेच्या किरणांची वाट पहात
टाकत असतो आपण उसासे | |२| |
आशा आहे जिवनात म्हणूनच
करता येते सहज निराशेवर मात |
निराशेच्या गर्तेत सापडलेल्यांना
आशेच्या किरणांचीच साथ | |३| |
आशा देते आत्मबळ आव्हानांना
सामोरं जाण्यासाठी लागणारं |
निराशाजनक प्रसंगी होते ध्येय
पुन्हा प्रयत्न करा सांगणारं | |४| |

