आपण नक्की भेटू...
आपण नक्की भेटू...
कितीही उशीर झाला, वाट चुकली, ..
तरीही आपण नक्की भेटू..
असेलच मी कुठेतरी एखादया
वळणावर थांबलेली तुझ्यासाठी..
शेवटचा श्वास असेल तोपर्यंत
मी आस लावून असेल तुझ्या वाटेवर..
सगळं बदललेलं असेल आजूबाजूला तुझ्या..
पण मी मात्र तीच आणि तशीच असेल
तुला हवी तशी तुझ्यातली मी..
कितीही उशीर झाला, वाट चुकली, हरवली..
तरीही आपण नक्की भेटू..
आपण नक्की भेटू..

