STORYMIRROR

Shivam Madrewar

Tragedy Others

3  

Shivam Madrewar

Tragedy Others

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली

1 min
219

शब्ददेखील सीमारेषेच्या बाहेर गेले,

विश्वचषकाचे ते साक्षीदार झाले,

आज मैदानाच्या डोळ्यातही पाणी आले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली

सुरुवातीची नाणेफेकही त्यानेच जिंकली,

हे पाहून दिग्गज खेळाडू बेभान झाले,

त्या खेळातले खेळपण आता हरवले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली

‘धोनी-धोनी’ म्हणून मैदानात नाव गुंजले,

तणावामध्ये त्याने प्रत्येकाला सांभाळले,

अनेक डावांचा शेवटही त्यानेच केला,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली

यष्टीरक्षणाच्या यादीत पहिल्यांदाच नाव असते,

सहा धाव काढून त्याने असंख्य डाव जिंकले,

हेलिकाॅप्टरसारखे टोले आम्ही उत्साहीले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली

विश्वचषकासोबत अनेक डाव त्याने जिंकले,

त्यांसोबत अनेकांच्या मनात त्याने राज्य केले,

आज आभाळदेखील ढसा-ढसा रडले,

आणि धोनीने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy