आमचे
आमचे
तुझे नी माझे काय करतोस
नाही काही तुझे माझे
संसार आपला दोघांचा असल्यावर
जे काही आहे ते म्हणजे आमचे
किनारा आणि समुद्र नसतोच वेगळा
तळ्यातील पडलेले चांदणे अन तळाही दोघांचा
माझ्या आवाजातील मौन ही तुच
अन नदीतील तळवा ही आपल्या दोघांचा
काॅफी अन त्यावरील नक्षीसुद्धा आमचीच
पडणाऱ्या पावसात घेतलेला चहा आमचा
ओल्या रस्त्यावरुन धावणारी बाईक आपलीच
गच्च पकडून बसणारे दोघेही आपणच
झाडाखाली सावलीत बसणारे आपण दोघेही
जे होते ते आपले दोघांचे होते
मग का करतोस माझा-तुझा
लिहीलंय बघ तुच आता जे-जे आपलेच होते
नव्हतेच ते तुझे माझे
जे होते ते आपले दोघांचे
पण कळले तुला कधीच नाही
म्हणून बोलत बसलास तुझे अन माझे
आपण कुठे होतो कधी वेगळे
पण तुला हे कळलेच कसे नाही
म्हणून तर दुरावा आला आपल्यात
अन प्रेमानेही दिली नाही कोणतीच ग्वाही