STORYMIRROR

Shital Yadav

Romance

4  

Shital Yadav

Romance

आलास ना परत

आलास ना परत

1 min
221

जगणे असह्य हे गेले आयुष्य आता सरत

होती आशा मनात पण आलास ना परत


केले प्रेम निर्व्याज काय हाच झाला गुन्हा

जपले नाते मात्र प्रीत ही होणार ना पुन्हा


उठतात तरंग विचारांचेच मनाच्या डोहात

स्वप्नांची केली बांधणी सोबतीच्या मोहात 


दिली कितीदा तुला हाक हृदयाने विरहात 

श्वास झाले दगाबाज प्राण ना राहिले देहात 


क्षणोक्षणी आठवांनी असे मनाला छळले 

आर्त प्रेम आजन्माचे कसे तुला ना कळले 


अवघ्या आयुष्यभर केवळ तुलाच रे स्मरले 

आलास ना परत फक्त वेदनेचे संकेत उरले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance