STORYMIRROR

Suvarna Patukale

Romance

3  

Suvarna Patukale

Romance

आकाश ही विचारी

आकाश ही विचारी

1 min
249

आकाश ही विचारी,

ही प्रीत का फुलावी

फुलता कळी ही मग का,

भ्रमरास वेड लावी


मनमीत त्या क्षणांची

गंधीत भावनांची

ही ओढ का मनाला

स्वप्नातही सतावी

आकाश ही विचारी...


सर्वात एक भासे

अन भासही सुखावे

दिसते कुठून अवचित

निमिषात ती दुरावी

आकाश ही विचारी...


सुखवीत येती स्वप्ने

अन् प्रीत ती निराळी

मजला असेच वाटे

ही रात्र पांघरावी

आकाश ही विचारी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance