आकाश चांदण्यांचे
आकाश चांदण्यांचे
बहरून आज आले
आकाश चांदण्यांचे
उजळले रूप मोहक
नभांगणातील तारकांचे
वाटे चंद्र लोभस नभातील
सूर छेडूनी स्वप्नांचे
अलवार विसावूनी नयनी
उजळूनी भाग्य पापण्यांचे
लखलखले रूप पहा
शरदाच्या चांदण्यांचे
पोर्णिमेच्या रातीला
वरदान चंदेरी सोहळ्यांचे
मोहक किरणे चांदरातीला
पसरले तेज किरणांचे
तिमिरास सारूनी दूर
पारणे फिटले नयनांचे
आसमंती विराजे छत्र
चंदेरी स्वप्न लोचनांचे
आवेग मनाचा आवरूनी
मन गुंतले कसे ललनांचे?

