आज्जी
आज्जी
आज्जी,ह्या नावातच सगळं असत,
आज्जी, ह्या नावातच सगळं जग बसतं!
तिच्या सारखे लाड एक आई पण करत नाही,
म्हणूनच आज्जी वर कधीच राग येत नाही!
नि:स्वार्थ भावाने करते ती सगळ्यांवर प्रेम,
तिच्या साठी तिचे सगळे नातवंड असतात सेम !
कधी रागावून,कधी गोड बोलून तर कधी सांगून एखादी गोष्ट,
हळुवारपणे, न कुरकुर करता, घेते नातवंडांचे कष्ट!
नेहमीच आई बाबां पासून अपल्याला ती वाचवते,
आयुष्यभराच्या आठवणी आपल्या मनात ती साठवते !
फर्माईशी घेऊन नेहमीच आधी गेलो आम्ही तिच्या कडे,
स्वतः पेक्षा ही जास्त लक्ष दिल तिने आमच्याकडे !
नशीबवान असतात ती नातवंडे ज्यांना लाभते आज्जी नावाची छत्री,
आज चुकल्या सारखा वाटतंय, वाटतंय आयुष्यातून सुट्लय काहीतरी!
बघता बघता संपली एक पिढी,
खरा सांगायचं तर स्वतः साठी कधीच जगली नाही ही पिढी!
साथ ह्यांची लाभली अपल्याला दीर्घकाळ,
खरच आज बघता बघता संपला एक काळ !!!
