आजची नारी
आजची नारी
आजची ती... स्त्री
नारी शक्ती बनली आहे
पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना
घरच्यांना तितकंच मायेने जपते
सासर आपलंसं करताना न थकता
माहेरही सांभाळते
अंतराळवीर असो वा सैन्य सगळीकडे
ती तिचा ठसा उमटवते
आजची नारी नवे तंत्रज्ञान
केले आता अवगत
प्रत्येक क्षेत्रात संगणक
नित्य हाताळत आहे
जिथे तिथे प्रत्येक क्षेत्रात ती कार्यरत आहे...
असे कोणतेच क्षेत्र उरलेले नाही...
जिथे एक ही स्त्री काम करत नसावी...
आज ती जिकडे तिकडे आपले
भविष्य आजमावत आहे...
