आज होळीचा सण...
आज होळीचा सण...
रंग उधळू मानवतेचे
रंग उधळू या समतेचे,
रंग राष्ट्रभक्ती आणि
रंग खेळू या एकात्मतेचे.
रंग विज्ञान प्रगतीचे
रंग आधुनिक क्रांतीचे,
रंग नीती मूल्यांचे
रंग आदर्श, प्रेरणेचे.
रंग बंधुत्व नात्याचे
रंग सत्य, अहिंसेचे,
रंग यश, उन्नतीचे
नवचैतन्य, जोशांचे
सारे फुलवू या जीवन
करु रंगाची उधळण,
आज होळीचा सण आहे
करु दुष्टांचे दहन..