Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Doshi

Classics

4.8  

Smita Doshi

Classics

आईच सर्व काही

आईच सर्व काही

2 mins
1.2K


कृष्णाची माय, श्यामची आई

रामाची माता,शिवाची जिजाई

सर्वांचं प्रेम एकाच ठायी

ते म्हणजे त्यांची आई-----


माझी आई ग्रेट आहे

माझी ती सर्वकाही आहे

माझं दुःख,माझं सुख माझी आई

माझं हसू,माझं रडू माझी आई-----


संकटातील बळ,ताकद आई

सुखाचा, आनंदाचा क्षण आई

आई शिक्षक, आई मास्तर

प्रेमात नाही जराही काटकसर-----


प्रेमाच्या तिच्या गावा जावे

तरीही ती कुणा न उमगे

तिचे दुःख कुणा न दिसे

स्वतःहून कुणी तिला ना पुसे-----


आई माझा देश,आई माझा देव

परमेश्वरा सदैव तिला सुखी ठेव

मी पामर,मी तिचा चाकर

पखरू दे मज तिजवर प्रेमपाखर-----


आई तू सौख्याचा ठेवा

देवालाही तुझा हेवा

कितीही घेतली तुझी परिक्षा

तू उतरवतेसच त्याचा नक्षा-----


नाही तुलना   तुझ्याशी कुणाची

नाही उच्च ता तुझ्या सम.कुणाची

तूच पर्वत,तूच प्रेमसागर

तूच रणचण्डिका,तूच दयासागर-----


 तूच माझं सर्वस्व,तूच माझं ममत्व

तूच माझं कनिष्ठत्व,तूच माझं श्रेष्ठत्व

नाही तुझ्याविषयी मनात दुरत्व

किती आणि कसं गाऊ तुझं महात्म्य-----


,तुझे ऋण फेडण्याची नाही शक्ती

तुझ्या ऋणातून नकोच मला मुक्ती

प्रणाम।नमस्कार।साष्टांग दंडवत

एवढेच केवळ माझ्या हातात--------


,त्रिकाल नमन।त्रिकाल वंदन

करितो तुज,तुझाच वंदन।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics