STORYMIRROR

Anuradha Pushkar

Inspirational

3  

Anuradha Pushkar

Inspirational

आई नावाचं पान

आई नावाचं पान

1 min
363

आई नावच पान ..कधीच जीर्ण न होणारं,अन नाही कधी गळून पडणारं ..

तुझ्या आशिर्वादाखाली खाली अनंत कोटी ब्रह्मांड ..तुझ्या पदराखाली होते अस्तित्वाची जाण....

तुझ्या प्रेमाचा ओसरत नाही बहर, तुझी एक हाक म्हणजे प्रेमाची लहर ...

देव रोजच तुझी परीक्षा पाहतो आणि तू त्याला हरवतेस ....

कुठून आणते स इतक बळ कि, तू देवालाही लाजवतेस..

आई काय लिहू तुझ्यासाठी शब्द हि अपुरे पडतात ..

भावना कंठात येऊन ,डोळ्यातून ओघळतात ....

 तुझ्या डोक्यावरचे ओझे कधीच नाही सरत.....

तरी तू कधी कशाचीच तक्रार नाही करत ...

काय गंमत आहे बघ न ग आई, 

वर्षातून एक दिवस तुझ्यासाठी सगळं काही करायचं

नंतर मात्र परत तुला गृहीतच धरायच...

किती थोर तुझी महिमा आणि किती तुझ्या व्यथा

शब्दही नाही इतके कशी लिहू तुझी कथा ....

जगातल्या सर्व मातांना माझ्याकडून छोटीशी भेट ....लिहण्यासाठी खरंच शब्द अपुरे आहेत तरी हि हा छोटासा केलेल प्रयत्न ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational