STORYMIRROR

Anuradha Pushkar

Romance

3  

Anuradha Pushkar

Romance

पाऊस

पाऊस

1 min
438

भरून राहण्यापेक्षा, बरसलेलाच बरा असतो

धगधगत राहण्यापेक्षा शांत झालेलाच बरा असतो..

अचानक यावा पाऊस धुवाधार

त्याच्या टपोऱ्या थेंबावरती अवघा देह व्हावा स्वार

अचानक यावा पाऊस ,सैरभैर व्हावे पक्षी

निळे जांभळे सघन आभाळ झुकावे जराशे वक्षी..

अचानक यावा पाऊस मन चिंब चिंब व्हावे

रोम रोम सुखवताना, शब्द न शब्द आभाळवे...

अचानक यावा पाऊस,सार काही धुवून जावं

शांत झालेल्या मनातून एक गाणं सहज ओठांवरती यावं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance