यमुनेच्या तीरी
यमुनेच्या तीरी
नभ उतरले आज यमुनेच्या तीरी,
शोधता सख्याला राधा झाली बावरी
गमतीत खेळ खेळतो हरी ,
उगीचच राधेवर रुसवा धरी ...
हि धरती नटली ,
सजला यमुनेचा तीर आतुर झाले मन
विरहात तुझ्या , बरसले नयन ...
कुठे शोधू तुला केशवा ,
तिर तुझ्या नजरेचा घायाळ करी
बासुरीच्या तालावर मी नाचते खरी .....
तूआहेस अनोखा ,तुझ्या सम नाही कोणी...
प्रेमात ह्या तुझ्या, लहर उठते रोम रोमांतुनी
बस कर आता , नको जीवास ह्या घोर
तुला पाहण्यासाठी नयन झाले रे आतुर ....
तुझ्या विना हे सारे जग अधुरे आणि मीही रे अधुरी ,
ऐकता राधेची आर्त हाक ,कृष्ण वाजवी बासुरी .....
यमुनेच्या तीरी राधा झाली रे लाजरी .......