आई मायेचा सागर
आई मायेचा सागर
माय मायेचा सागर
जशी मंदिराचा कळस
माय शब्दच असतो पवित्र
जशी अंगणातील तुळस ||
बोलायला, चालायला शिकवी
तिच्यामुळेच जगण्याला अर्थ
अस्तित्व घडवणारी माझी माय
तिच्याविना माझे जीवन व्यर्थ ||
असते दुधाळ,मधाळ सावली
हृदयी साठा ,सुखाचा माय
जिवाचे रान करणारी आय
जशी भासते दुधावरील शाय ||
आईचे जन्मो जन्मीचे ऋण
तिने सोसल्या यातना कोटी
जगी मोल नाही यातनाचे
जन्म लाभला तिच्या पोटी ||
आई साष्टांग नमन चरणी
आहेस आई लय भारी
म्हणून स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी ||