STORYMIRROR

Vijay Sanap

Classics Drama

3  

Vijay Sanap

Classics Drama

आई- माझा गुरू

आई- माझा गुरू

1 min
15.8K


आई गुरु चरणाला

माझे पहिले वंदन

दिला तिने मला जन्म

तिचे गातो गुणगाण ।।


आई चालाया शिकवी

शिकवते बोलायला

ईश्वराच्या भजनात

लावी मान डोलायला ।।


जीवापाड केलं प्रेम

केलं लहानाचं मोठं

जाई पोट खपाटीला

पाजी मला दोन घोटं ।।


गुरू माझी जन्मदात्री

मारी पदराला ती गाठी

ओल्या मातीत राबते

माय मह्या भल्यासाठी ।।


मला घालून शाळेत

माय गुरू झाली माझा

दिले संस्कार शिक्षण

जगी बनविले राजा ।।


माय मही शांताबाई

तिला मानतो मी गुरू

जिनेे केले संगोपन

तिला कसं हो विसरु ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics