STORYMIRROR

Sanjivani Wankhede

Inspirational

3  

Sanjivani Wankhede

Inspirational

आई हिरकणी

आई हिरकणी

1 min
382

जिजाईची जेथे पुण्याई 

हिरकणी इथे हरेक आई.

उभा रायगडाचा तो ऊतार

त्यात रात्रीचा तो प्रहर.

बाळासाठी खोसून हो पदर

उतरूनी कडा केला पार.

वाटेत अगणित अडथळे

काटयाचे पसरले जाळे.

पौर्णिमेचा तो चंद्रप्रकाश

पाठीराखा भ्राता मदतीस.

माऊलीस बाळाची ओढ

गात निघाली अंगाई गोड.

तिचे चित्त नाही थाऱ्यावर

टाकली पाऊले भराभर.

झोपडीचे दिसता ते दार

बाळाची भेट हो अनावर.

काळजास घेता मग हाती

माऊलीची त्या काळजी मिटली.

धन्य ती आईची माया

बाळापायी झिजवली काया.

शिवरायही नतमस्तक जाहले

धाडसी मातेस गौरविले.

ज्या काठी तिची उतराई

नाव दिधले हिरकणी आई.

तान्ह्या बाळासाठी हे शोर्य

माऊलीसच शक्य हे कार्य.

ऐसी माता लाभे जयास

तो पुत्र असे किती खास.

गवळण ती साधी हिराबाई

जगद्विख्यात तिची गाथा ही.

हर मातेस लाभले वरदान

हिरकणी तिच्यात अंतर्द्यान.

नतमस्तक होता मातृचरणी

मज आई भासतसे हिरकणी.


Rate this content
Log in

More marathi poem from Sanjivani Wankhede

Similar marathi poem from Inspirational