आभास...
आभास...
गडद काळ्या रात्रीचा तो लख्ख सोनेरी स्पर्श जाते जागवुनी,
चंद्र डोकावे खिडकीतून वाऱ्यास लाजून पणती घेते झाकूनी ...
मृगजळ लागले पाठी इथे छळते दिवसरात्र हा आभास तुझा ,
मेघाशी कट्टी केली तरी बरसतो तो लाजून माझ्याच अंगणी ...
नैन बोलते आता आरश्यात माझ्याच तुला बघून प्रतीबिंबाशी,
मी ,मी ना राहले सख्या ने मज डोलीत सनई चौघडे वाजवूनी...
नाही साभांळत मन दूर तू तरी जवळ का ? भासतो मजला,
तुझ्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यासवे मन बेधूंद होते भान हरपूनी...
ये ना माझ्याजवळ सख्या आतूर हरणी तुझीच वाट पाहते,
चातकाची तहान माझी बरस श्रावणा मृदूगंध श्वासात भरूनी...

