STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

आभास अनोखा

आभास अनोखा

1 min
236

सकाळच्या सुंदर साखरझोपेवर

तुझ्या आठवणींची मंद झुळूक आली

त्या धुंद सुगंधानेच 

मला जाग आली


तिला आठवतच उठलो

अंथरूणातून सावरत स्वतःला

आता निघायचय कॉलेजच्या बहाण्याने

तिलाच पुन्हा पहायला


सकाळच्या रिमझिम पावसात

तिला स्वतःला सावरताना पाहिल

निघालो असलो जरी पुढे

मन माझ मात्र तिथेच राहिल


आज बरच काही सांगून गेली

ती फक्त एका हसण्यातून

माहीत नाही? काय किमया झाली

तिच्या एका बघणातून


आजच्या या अबोल भेटीचा

तो पाऊस साक्षी होता

त्या क्षणांना सुखावह करण्यासाठीच

कदाचित बरसत होता


तू असलीस समोर की

शब्दही अबोल होतात

मनात तरंगणाऱ्या भावना

अलगद विरून जातात


तुलाही चाहूल लागली असेल

की मला काहीतरी सांगायचं आहे

मान्य नसले तुला तरीही

मनापासून सांगतो तुझ्यावर खूप प्रेम आहे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance