STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Inspirational

आई नव्हे रणरागिणी.

आई नव्हे रणरागिणी.

6 mins
21.4K

वीणा आज एक जण येईल बघ आपल्या रूम बघायला त्याच नाव रूपेश आहे, माझ सगळ बोलण झाल आहे त्याच्या सोबत तू रूम दाखव आणि माणूस बरा वाटतो का बघ नितीश त्याच आवरत म्हणाला. हो दाखवते पण तुम्हाला कसा वाटला बोलून? वीणा म्हणाली. हो ग तसा बरा वाटला, इथे नोकरी करतो एकटाच असतो. चल मी येतो म्हणत नितीश ऑफिस ला गेला. मग वीणा तन्वी ला उठवायला गेली. तनु सात वर्षाची होती आता कोरोना मूळे शाळा बंद मग ती निवांत उठायची दुपारी तिचा ऑनलाईन क्लास सुरू व्हायचा. वीणा आणि नितीश चे दोन मजली घर होते. खाली चार रूम होत्या तिथे हे राहायचे आणि वरती टेरेस आणि दोन रूम होत्या त्याच रुम भाड्याने द्यायच्या होत्या. ते पाहायला रुपेश येणार होता. दुपार नन्तर रुपेश तिथे आला. वीणा ने त्याला रूम दाखवली. तो एकटाच होता आणि सध्या कोरोना मुळे घर कोठे मिळत न्हवते म्हणून रुपेश ने रुम आवडली असे सांगून डिपॉझिट ची रक्कम वीणा ला देऊन गेला. उद्या माझे सामान घेऊन येतो बोलला. दुसऱ्या दिवशी सकाळी रुपेश आला तर नितीश नाष्टा करत होता तेव्हा रुपेश रूम ची किल्ली मागायला आला. नितीश ने त्याला आग्रह करून आपल्या सोबत नाष्टा करायला बसवले. वीणा आणि नितीश एकदम माणुसकी वगैरे जपणारे सगळ्याना मदत करणारे असे जोडपे.

तनु तेव्हा उठली आणि बाहेर आली कोण आले पाहायला. नितीश म्हणाला, तनु बेटा हे अंकल आता आपल्या वरच्या रुम मध्ये राहणार आहेत. तसा रुपेश ने तनु ला हॅलो बोलला. ती पण बोलली. मग चहा नाष्टा करून रुपेश रूम कडे गेला. थोड्याच दिवसात तो वीणा आणि नितीश सोबत चांगला रमला. तनु पण त्याला अंकल म्हणत खेळत राहायची कधी त्याच्या कडे होमवर्क करायला घेऊन जायची. वीणा काही स्पेशल जेवण बनवले असेल तर रुपेश ला आवर्जून द्यायची. आपल्या भावा सारखे त्याला मानत होती. एकटाच आहे घरचे लोक गावा कडे आहेत. या भावनेने ती त्याला खाऊ पिऊ घालत होती. एक दिवस तनु होमवर्क करायला अंकल कडे जाते असे वीणाला सांगून रुपेश कडे आली. तो मोबाइल मध्ये गुंग होता. तनु ने आवाज दिला अंकल काय करता तसा तो भानावर आला.

अरे तनु ये ये काय होमवर्क करायचा काय? हो अंकल तुम्ही घ्याल का माझा होमवर्क तनु बोलली. हो दाखव मला म्हणत रुपेश ने तिला आपल्या शेजारी बसवले. तो मोबाईल वर पॉंर्न व्हिडिओ बघत होता. तनु त्याला अभ्यासाचे सांगत होती पण त्याचे लक्ष तिच्या नाजूक ओठा कडे हातां कडे होते. त्याच्या मनातला सैतान जागा झाला होता. त्याने हळूहळू तनूच्या पाठीवरुन हात फिरवायला सुरुवात केली . तनु ला काही समजले नाही मग त्याने तिच्या गालावरून हात फिरवला बोलत बोलत तिचे गाल ओढले. हळूहळू तिच्या फ्रॉक च्या आत हात घालून सगळी कडे हात फिरवू लागला. तनु ला समजेना तिला कसे तरी वाटत होते ती बोलली अंकल हात काढा ना. पण त्याने हात नाही काढला मग तो तिच्या छातीवर आणि खाली निकर वरून हात फिरवत राहिला. मग तनु ला हे जरा विचित्र वाटले ती चटकन उठली आणि मी जाते घरी म्हणत पळत खाली आली. तिला याचा अर्थ काही समजला नाही. आता जेव्हा जेव्हा रुपेश नितीश कडे खाली असायचा तेव्हा मुद्दाम तो तनु ला सहज स्पर्श करायचा. चार पाच दिवसांनी तनु तो मागचा प्रसंग विसरून गेली आणि परत रुपेश कडे गेली अभ्यासा साठी तर त्याने परत तसेच केले. तिची छाती दाब मांडी दाबु लागला. मग त्याने तिच्या निकरवरून हात फिरवायला सूरुवात केली तशी तनु उठली आणि खाली पळत आली. वीणा बोलली काय ग काय झाले तनु पळत का आली खाली. तनु काही बोलली नाही. आता तनु रुपेश ला बघून पण घाबरू लागली. तो घरात आला तरी बेडरूम मध्ये बसायची. आता तनु रुपेश कडे जात नसायची. दोन दिवसांनी तनु चा वाढदिवस होता. वीणा नितीश रुपेश आणि तनु चे थोडे मित्र मैत्रिणी होते वाढदिवसाला. केक कापला सगळ्यानी तनु ला केक भरवला रुपेश ने ही केक भरवला आणि तिच्या गालावर किस केले. तशी तनु पळत रूम मध्ये गेली आणि टॉवेल ने आपला गाल पुसू लागली. इकडे वीणा सगळ्यांना केक आणि खाऊ देत होती. बराच वेळ झाला तनु बाहेर नाही आली सगळे जण आपल्या घरी गेले होते. रुपेश ही गेला. वीणा तनुला पाहायला आली तर तनु बेड वर पायावर डोकं ठेवून रडत होती. वीणा तिच्या जवळ गेली बोलली तनु काय झाले आणि तू रडत का आहेस आज वाढदिवस ना तुझा मग का रडतेस. पण तनु काहीच बोलेना वीणा ला काळजी वाटू लागली. नितीश ही कामा साठी जरा बाहेर गेला होता. वीणा ने विचारले तनु काही त्रास होतो का तुला ? तरी तनु बोलेना. वीणा ने तनु ला जवळ घेतले आणि विचारले कोण काय बोलले का तुला सांग मी त्याला ओरडते. तशी तनु बोलली तू रुपेश अंकल ला तू ओरडनार का? तो खूप बॅड अंकल आहे. का अंकल काही बोलला का तुला वीणा म्हणाली. तेव्हा रडत रडत तनु ने रुपेश कसा वागतो तिच्याशी हे सांगितले . वीणा हे सगळं ऐकून शॉक झाली.

ज्याला घरच्या सारख वागवलं खाऊ घातल तोच माज्या मुलीशी असा घाणेरडा वागला. वीणा ला संताप झाला काय करावे याने रुपेश ला चांगली अद्दल घडेल? त्याला जबरदस्त शिक्षा व्हायला हवी तरच तो तनु सारख्या मुलीच्या वाटेला जाणार नाही. वीणा बोलली तनु आता तू मला जे सांगितलेस तेच तू पोलीस अंकल ला सांगशील का? हो मम्मा मी सांगेन. मग वीणा तनु ला घेऊन सरळ पोलीस चौकित आली आणि कम्प्लेन्ट द्यायची आहे बोलली. मग पोलिसांनी तनु ला सगळं विचारले आणि रुपेश ची कम्प्लेन्ट दिली. पोलीस म्हणाले आता कुठे तो रुपेश? घरीच असेल विणा म्हणाली. मग वीणा सोबत पोलिस तिच्या घरी आले.रुपेश च्या रूम कडे गेले. दार बंद होते पोलिसांनी दार वाजवले. रूपेश ने दार उघडले आणि दारात वीणा तनु आणि पोलिसांना पाहून घाबरला. काय झाले त्याने विचारले. तसे पोलीस म्हणाले,काय झाले ते तुला सांगतो चल आता चौकीत. मी काय केले पण रुपेश घाबरत म्हणाला,या तनु वर तू लैंगिक अत्याचार केलेस ती तुझ्या कडे यायची तर तिच्या शी तू असभ्य वर्तन करत होतास. नाही ओ मी असे काही नाही केले तो म्हणाला.या तनु ने सांगितले आहे आम्हाला,तेव्हा गपचूप चल नाहीतर बेड्या ठोकून वरात काढीन तुझी पोलिस म्हणाले. तसा गपचूप रुपेश पोलिसां सोबत गेला. जाताना पोलिस वीणा ला म्हणाले,तुमच्या सारखे धाडस प्रत्येक आई ने करायला हवे. आपल्या मुली शी कोण असभ्य वर्तन करत असेल तर अशा नराधमांना वेळीच ठेचायला हवे. रुपेश ने केलेला प्रकार हा बाल लैगिंक अत्याचार चा आहे त्याला योग्य ती शिक्षा देऊ पण तुम्ही एक जागरूक आई आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. पोलिस गेले. विणा तनु ला म्हणाली आता गेली ना भीती तुझी. त्या अंकल ला पोलिस घेऊन गेले. तनु असे परत कोणी वागले तुज्याशी तर लगेचच मला येऊन सांगायचे. हो मम्मा म्हणत तनु तिच्या गळ्यात पडली.नितीश घरी आला तसे वीणा ने सगळा झाला प्रकार त्याला सांगितला त्याला ही हे सगळे शॉकिंग होत. त्याने तनु ला विचारले बेटा तू ठीक आहेस ना? हो पापा तनु हसत बोलली.

वीणा तू खरच ग्रेट आहेस तू ही तत्परता दाखवली नसतीस तर त्या रुपेश ला अद्दल घडली नसती. नितीश म्हणाला. हो मी आई आहे आणि मुलीचे संरक्षण काळजी मलाच घ्यावी लागणार ना. आई म्हणून कायम माझी ढाल माझ्या मुलीच्या सोबत असेल वीणा म्हणाली. नितीश ने प्रेमाने दोघींना जवळ घेतले. इकडे पोलिसांनी रुपेश चा मोबाईल चेक केला तर त्यात बरेच पॉर्न व्हिडीओ होते आणि काही मुलीशी केलेले सेक्स चँट पण होते. यावरूनच सिद्ध झाले की रुपेश एक घाणेरड्या वृत्तीचा माणूस होता. म्हणूनच त्याने तनु शी तसे वर्तन केले आणि त्याने ते कबुल ही केले. रुपेश ला या गुन्ह्यासाठी कमीत कमी सात वर्षे कारावास तसेच दंड अशी शिक्षा होऊ शकते.आपली मुलगी कुठे जाते कोणा सोबत असते तिच्या शी कोणी गैर वर्तन तर करत नाही ना याची प्रत्येक आई ने काळजी घ्यावी. तसेच आपल्या मुलांना मुलगा आणि मुलगी दोघांना ही गुड टच आणि बॅड टच याची माहिती जरूर द्यावी..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational