Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Fantasy

3  

Jyoti gosavi

Fantasy

जादू आणि पिके हरवलेले भाऊ

जादू आणि पिके हरवलेले भाऊ

6 mins
335


पिके आपल्या यानाचा हरवलेला भाग शोधत होता तो साधू महाराजांनी स्वतःच्या कब्जात केलेला होता आणि पिके तो मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करून द्या मला परंतु त्याला काही तेथे कोणीही हात लावू दिला नाही शिवाय पृथ्वीवरील माणसांचे बोलणे त्याला समजतच नव्हते एकदा म्हणत होता की कोणी म्हणत होते की देव आहे कोणी म्हणत होते की देव नाही कोणी चमत्काराला नमस्कार करत होते तर कोणी त्याला जादूटोणा म्हणत होते त्याला बाकीच्या गोष्टींशी देणेघेणे नव्हते त्याला आपल्या ग्रहावर जाण्यासाठी यानाचा तो महत्त्वाचा भाग पाहिजे होता तो म्हणजे एक प्रकारे त्याच्या यानाची किल्ली होती परंतु त्या साधू बाबाला तो आपल्याला परमेश्वराने पाठवलेला आशीर्वाद आहे प्रसाद आहे असेच वाटत होते आणि त्याच्या नावाखाली तो लोकांना लुटण्याचे काम करत होता त्यातच पिके चा विचित्र चेहरा लगेच ओळखू येत असल्यामुळे त्याचे त्रिकोणी कोण कान र्वांच्या नजरेत पडत असल्यामुळे त्या आश्रमाच्‍या आसपास देखील त्याला कोणी फिरकू देत नव्हते पिके लपतछपत आश्रमाच्या भिंतीवरून उडी मारून गेला आत गेला आणि शोध काढत काढत तळघरात जाऊन पोहोचला.


बाहेर बाबांचे प्रवचन चालू होते खूप मंडळी तिथे जमा झालेली होती आणि बाबा परमेश्वराने पाठवलेला आशीर्वाद म्हणून त्या यानाची किल्ली सर्वांना दाखवत होते अर्थात परग्रहावरून आलेली ती किल्ली चमत्कारी होती. डाव्या बाजूला फिरवली सगळे लोक आपोआप बाजूला वळत उजव्या बाजूला फिरवली सगळे लोक आपोआप उजव्याबाजूला फिरत सगळे सिक्युरिटी सदर चमत्कार पाहण्यात दंग होते तरीपण एका सिक्युरिटी ने पिके ला बघितलेले होते परंतु मंदिरातून चोरलेली दोन हजाराची नोट त्याने सिक्युरिटीचा हातावर ठेवले त्याबरोबर सिक्युरिटी त्याच्याकडे पाठ करून कार्यक्रम बघू लागणार तळघराच्या तळघराचे कुलूप पिके आपल्या एका दृष्टिक्षेपात पाने उघडली आत आज बरेच काही अवैध सामान खचाखच भरलेले होते तळघरात आणीत पशुपक्षी पडलेले होते काही बेशुद्ध केले होते त्यात एका अवाढव्य बांधलेल्या गोणी मधून हालचाल जाणवली आणि पिके ने गोणीचे तोंड सोडले आज बघितले तर एक केसाळ अस्वला सारखा दिसणारा विचित्र डोळे असणारा व्यक्ती होता त्याने बाहेर आल्याबरोबर मोठा श्वास सोडला नाहीतर तो बेशुद्ध पडणार होता आणी धूप धूप असे ओरडू लागला त्याचा आवाज खूपच क्षीण झाला होता झालेला होता वास्तविक तो आपल्या भाषेत बोलला मला इथे खूप जीव गुदमरतो आहे मला बाहेर घेऊन चल मला धूप मिळाली तरच मी ताकतवान होऊ शकतो


त्याची भाषा पी पी केला आपोआप समजली पी केला याचे आश्चर्य वाटले तुझे नाव काय तू कुठून आलास पिके नाही विचारले मी झेन नावाच्या ग्रहावरून येते खाली आलो आहे त्यावेळी मी खूप लहान होतो आपल्या ग्रहावरील आमच्या ग्रहावरील काही माणसे आपल्यासारखाच दुसरा ग्रह आहे का असे शोधत-शोधत पृथ्वीच्या संपर्कात आले आमचे यान पृथ्वीवर उतरले परंतु तेवढ्यात इथल्या मनुष्यांना आमचा शोध लागला ते आमच्यापेक्षा ताकत्वर होते ते त्यांनी आम्हाला आमला करून नष्ट केले असते त्यामुळे सगळेजण घाईघाईने यांना मध्ये चढले आणि मी कडेपर्यंत यान मला येथेच पृथ्वीवर सोडून निघून गेले त्या यानात माझे आई-बाबा होते अरे अरे हि हाकिगत तर माझ्या मोठ्या भावाची आहे तुझ्या बाबांचे नाव काय होते अपोलो आणि आईचे नाव मी मा अरे हे तर माझ्या आई बाबांचे नाव आहे आणि ही तर माझ्या हरवलेल्या भावाची कहाणी आहे माझी आई नेहमी त्या भावाची आठवण काढून रडत असते परंतु पुन्हा त्यांना पृथ्वीवर येणे शक्य झाले नाही तुझे नाव काय जादू नाही तुझे नाव जादू नाही ते इथल्या पृथ्वीवरच्या लोकांनी ठेवले खरे ना हो इथले लोक मला जादू म्हणतात माझे खरे नाव नको ना अरे तू तर माझा माझा मोठा दादा आहेत त्यानंतर खूप वर्षांनी मी झालो पण तू माझ्यापेक्षा वेगळ्या दिसतोस आपल्या ग्रहावर च्या लोकांनी देखील प्रगती केली आहे आता तेथील नवी पिढी पृथ्वीवरील माणसांसारखे दिसते जेव्हा हे यान पृथ्वीवर आले होते तेव्हा तेथील माणसे बघून आपण देखील असेच व्हावे असे सर्वांना वाटले आपल्याला देखील असेच सुट्टीत हातपाय आणि शरीर मिळावे यासाठी त्यांनी अनेक जनुकीय बदल केले आणि आता पुढील सर्व पिढ्या 90% इथल्या मानवासारखे दिसतात फक्त कान चेहरा आणि डोळे अजून बरोबर विकसित करता आले नाही पण आता आपण दोघे देखील येथे अडकलो आपली आई खूप रडत असेल मला पण तिकडे जायचे आहे मी इथे खूप वर्षे राहिलेला आहे रोहितला मी एकदम शहाणा करून सोडला आता त्याला देखील मुले झाली पण मी अजून येथे अडकलोय तुझ्या-माझ्यात वीस वर्षाचा तरी नक्की अंतर आहे मला पृथ्वीवर येऊन वीस वर्षे झाली दादा माझ्याकडे पृथ्वीवर यान आहे मी यांना बरोबर आलेला आहे परंतु यानाची जीत किल्ली असते ना ती ह्या साधुबुवा कडे आहे ती कशी पण काढली तर आपण दोघे आपल्या ग्रहावर जाऊ शकतो ठीक आहे सध्या तू मला लपून-छपून उन्हामध्ये मला धूप मिळाली किमी ताकत्वर होईल पिके नेत्याला पुन्हा गोणीत बंद केले आणि ती गोणी उडत उडत बाहेर आणली ॉ


अजूनही सर्व लोक प्रवचनामध्ये दंग होते आणि त्याच्या किल्लीचे चमत्कार बघण्यात दंग होते त्यामुळे कोणाचेही तिथे कडे लक्ष नव्हते आश्रमाच्या पाठीमागच्या बाजूला गौरीचे तोंड उघडल्याबरोबर जादू त्यातून बाहेर आला एखादी बॅटरी कशी चार्जिंग व्हावी तसा अर्ध्या तासाच्या आत तो शंभर टक्के चार्ज झाला आता तो कोणतेही शक्तीचे काम करायला तयार होता छोटू तू एक काम कर तू यांच्या प्रवचना मध्ये जा आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल जेव्हा तुला पकडायला सगळे मागे लागतील तोपर्यंत मी यानाची किल्ली घेऊन येतो फक्त आपले यान कुठे पार केले आहे मला सांग मला येथील येरीया माहित आहे आपले यान या आश्रमाच्या बाहेर एक मोठा वड आणि पिंपळ यांचा मिलाफ झालेला एक वृक्ष आहे त्या वृक्षाच्या फांद्यांमध्ये आपले यांनी लपवून ठेवले आहे ते आकाराने षटकोनी आहे आणि आणि साधू बाबाच्या हातात जे निळ्या हिरव्या रंगाची षटकोनी आकाराची वस्तू आहे तीच आपल्या यानाची किल्ली आहे ती मधोमध बसवली की आपले यान कार्यक्षम होईल त्यानंतर दोन्ही भावाने एकमेकाला गळामिठी मारली आणि आपल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या भावा हा शेवटचा प्रयत्न हा जर फसला तर आपण पण कायम इथेच राहणार हॅलो तुला पण पकडतील आता मला ते कोणत्यातरी अमेरिका नावाच्या देशाला विकण्यासाठी पळून घेऊन आलो आलेत आणि तळघरात कैद करून ठेवले होते. तुला देखील असेच कुठल्यातरी देशात नेऊन विकतील. तेथे ते लोक आपण काय आहे हे बघण्यासाठी आपली चिरफाड करतील आणि ह्या आश्रमातील लोकांना लाखो डॉलर्स मिळतील. तेव्हा जीव तोडून प्रयत्न केला पाहिजे..


पहिल्यांदाच भेटलेल्या त्या दोन्ही भावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यानंतर आपल्या मनाला आवर घालून पिके पब्लिक मध्ये गेला, मागच्या वेळी तो येथे नागडाच आला होता पण आता त्याचे अंगावर कपडे होते. तरीपण लोक त्याच्याकडे पाहू लागले. पिके एकदम स्टेजवर गेला आणि सांगू लागला मला देवाने पाठवले आहे. आणि "देवाचा आशीर्वाद" परत मागितलेला आहे.महाराज मला मदत करा. त्याबरोबर महाराज त्याच्यावर खवळले आणि भक्तगण देखील खवळले त्याला मारण्यासाठी महाराज त्याच्या मागे पळू लागले. त्यांच्या मागे भक्तगण देखील पळू लागले कारण हाच माणूस आतापर्यंत चार वेळा" देवाचा आशीर्वाद" चोरण्यासाठी आला होता. यानेही वस्तू जर नेली तर आपले चमत्कार बंद होतील आणि आपला धंदा बंद होईल हे बाबाला माहित होते. या क्षणांचा फायदा घेऊन जादू एका उडी मध्ये स्टेजवर गेला. स्टेजवरती एका शिष्याच्या हातात "देवाचा आशीर्वाद" म्हणून यानाची किल्ली महाराजांनी दिली होती. जादूने त्या शिष्याला उचलून पळ काढला आणि बरोबर पाठीमागच्या झाडावरती जाऊन आपले यान शोधून काढले .त्यामध्ये ती किल्ली फिट्ट बसली त्या शिष्या सकट यान सुरू केले. इकडे पिके पळत होता आणि त्याच्या मागे भक्तगण देखील पळत होते. जादूने आपले षटकोणी यान बरोबर पिके च्या माथ्यावर आणले.त्यातून एक शिडी सोडली त्या शिड ला धरून पिके वर गेला. आत मधे महाराजांचा गोपाळ नावाचा शिष्य भेदरून बसला होता.


वाचवा! वाचवा! म्हणून खालच्या लोकांकडे बघून गोपाळ ओरडत होता. लोकांनी गोपाळचा ओझरता चेहरा बघितला. पण आवाज ऐकू आला नव्हता. परंतु तेवढ्यात पिके आत बसला यानाचे दरवाजे बंद झाले आणि सदर यान आपल्या ग्रहाच्या दिशेने वाटचाल करू लागले.इकडे साधुमहाराज आपल्या प्रवचना मध्ये लोकांना सांगू लागले मला सकाळीच परमेश्वराने दृष्टांत दिला होता की आज तुला दर्शन देणार म्हणून परंतु मला ते समजले नाही आणि माझा गोपाळ शिष्य तर माझ्यापेक्षा पुण्यवान निघाला.तो सदेह वैकुंठाला गेला. इकडे महाराजांचे प्रवचन रंगात आले होते.

तिकडे यान आपल्या ग्रहाच्या दिशेने वाटचाल करत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy