*चिरायू होवो भारतीय स्वातंत
*चिरायू होवो भारतीय स्वातंत
चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्य*
चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्य "हेच स्वप्न उराशी बाळगुन देशाप्रती आदर निष्ठा राखून आपण आज स्वतंत्र भारतात वास्तव्य करीत आहोत. ज्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळी आपण खुप लहान किंवा या जगात आलो नव्हतो. आपला जन्मच झालेला नव्हता, पारतंत्र्यात त्यावेळी काय परिस्थिती असेल ही गोष्ट आपण अनुभवली नाही म्हणुन आपणास नाही कळणार. पारतंत्र्यात आपल्या लोकानी कशी अवहेलना भोगली होती. हा सर्व आखो देखा हाल दृष्टांत त्या पारतंत्र्यात राहणाऱ्या लोकांनाच माहीत असेल. फक्त आपण त्याची जाणिव ठेवणे महत्वाचे आहे.
१५ ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सर्व मिळून उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो, जयघोष करीत असतो, राष्ट्रध्वज तिरंग्याचा मान करतो. आपल्या भारतात हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जात असतो. यादिवशी शाळेत,विद्यालयात, गावात, नगरात, चौकात, शासकिय कार्यालयात, अनेक सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाचा कार्यक्रम होतो. मिरवणुक काढत असतो. "चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्य" आशा घोषणा करीत असतोय. परंतु त्या कृतित उतरवने किती महत्वाचे आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.
जुन्या काळाचा जर विचार केला तर आपल्या पुर्वजाची पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्यासाठी किती भोग भोगले त्यांची तळमळ देश प्रेमाची ग्वाही देत होती. अत्यंत कष्टप्रद व दु:खद वाटचाल त्यांनी केली होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. पुढील पिढीसाठी त्यांनी स्वातंत्र्याची नवीन पहाट आणली. त्या थोर पुरुषांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले आणि हसत हसत फासावर चढले. त्यांच्या देशभक्तीला काय म्हणावे किती जागृत देशभक्ती त्यांच्यात सामावलेली होती आणि त्यांनी सर्व पुढील पिढीसाठी केलेलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. परंतू आपण या सर्व गोष्टी विसरून जातोय ही फार खेदाची गोष्ट आहे.
पारतंत्र्याची पुढील पिढीवर छायाही नसावी अशी महत्त्वाकांक्षा घेऊन पुर्वजांनी क्रूरतेशी समोरासमोर लढा दिला होता. ही त्यांची मानसिकता होती म्हणून थोर पुरुषांमध्ये त्यांची गणना झाली. त्यांनी आपल्या सुखाला मूठमाती देऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले ही खूप अमूल्य देणगी होती, तरुण पिढीला स्वातंत्र्याचे किती कौतूक आहे आणि त्या स्मृती सांभाळता येतील काय?काही तरुण पिढीला आपण स्वातंत्र्यदिवस कश्यासाठी मनवतोय हे ही माहित नसावं यापेक्षा दुर्दैव कोणते असेल? असले साशंक चित्र आज देशभक्त लोकांना विचलीत करीत आहे. हा एक मोठा गंभीर प्रश्न त्यांचेसमोर उभा आहे.
शाळेत लहानपणी आपण सहजच प्रभात फेरी काढून भाषण देऊन मिरवत होतो, परंतू मोठे झाल्यावर त्याच मुलांना, पालकांना त्याचा विसर पडतो आहे. आता मुलांना झेंडावंदनाची तितकीशी गोडी राहिली नाही. त्याचे कारण म्हणजे आजच्या पिढीला सर्व आयतं मिळाल आहे. जी वस्तू मोफत किंवा विनाकष्ट मिळते त्याची किंमत नसते. आपल्या जुन्या पिढीने आपल्या जीवावर खेळून हे स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक व्यक्तीने दोन शब्दाने त्यांचा सन्मान करणे व स्वाभिमान ठेवणे, ही काही सांगावयाची गरज नाही ती मनातून स्फुरली पाहिजे. आणि चिरायू होवो भारतीय स्वातंत्र्याचा
मंत्र जगण्यासाठी झटले पाहिजे.आपल्या देशाला सावरले पाहिजे.
या विज्ञानयुगात तंत्रज्ञानाची जेवढी शान आहे तेवढी इतिहासाची जाणिव दिसत नाही. देश पूर्णतया बदललेला आहे, इथली लोकं पूर्ण बदललेली आहेत, आपला परिवार, आपले मित्र, आपलं शिक्षण यापलीकडे त्यांना कोणत्याच गोष्टीत गोडी नाही की विशेष रस नाही.
बघायला गेलो तर आपल्या भारत देशाच्या परंपरेचा इतिहास खुपच महान व दैदीप्यमान आहे. इथे सर्व जाती-धर्म-संप्रदाय मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि तशीच चुणूक आपल्या भारत देशातील कर्तबगारांनी दाखविली आहे. हजारो कार्य पुर्णत्वास नेले आहेत. " हम भी कुछ कम नहीं " हे दाखवून दिले आहे. जर गुलामगिरीच्या विळख्यातून भारत स्वतंत्र झाला नसता तर परस्वाधीन होऊन मुक्या जनावरासारखे आपण खितपत पडलो असतो. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाला संपूर्ण जगात नामानिराळी ओळख मिळाली नसती. वेठबिगार होऊन गुलामी करून जी हुजूरी करतांना आपले आयुष्य संपले असते.
तसेच आताच्या तंत्रज्ञानाने अतिशय वाखाणण्याजोगी प्रगती केली आहे. आधुनिक अस्त्र-शस्त्र, चांद्रयान, लडाकू विमाने या सर्वांच्या प्रगतीने महाशिखरे गाठली आहे. प्रचंड लोकसंख्या असुन सुद्धा मिळेल ते भाकर, तुकडा खाऊन टक्कर देतो आहे. या सर्व गोष्टीचा अभिमान बाळगुण देशाचा कायापलट करण्यासाठी पूढे सरसावून बंधुता राखून, शांतता पाळून आपण आपल्या देशाची अस्मिता राखली आहे आणि मोठ्या पातळीवर ऐतिहासिक कार्य करून पूर्ण जगात आपली चमक दाखविली आहे.
"आपला स्वतंत्र भारत देदीप्यमान, अखंड , सबळ असावा" की कोणी त्यावर कधीही तिरप्या नजरेने सुद्धा बघायला नको. त्यासाठी सर्वानी मिळून मिसळून, ऐक्य साधून कार्य करावे लागेल. हे सर्व अबाधित ठेवण्यासाठी चांगल्या विचाराची देवाणघेवाण करावी लागेल, बंधूभाव टिकवून सामंजस्याने वागावे लागेल. नाही काही करता आले तरी समाजात फुट पाडून भांडणे लावू नये. आपल्या गावाला स्वच्छ, सुंदर, सुशोभित व साक्षर करून कायदा व सुव्यवस्था राखणे महत्वाचे आहे. चांगले आचरण आणि चांगली नीतीमत्ता ठेवून आपले व्यक्तीमत्व तेजस्वी करायला पाहिजे. तेव्हाच आपण व आपला देश समृद्ध होऊ शकतो.
आजची गरज म्हणजे आपण पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाला आहारी जावून आपल्या देशाशी गद्दारी करत आहोत. नव्या पिढीने पाश्चात्यिकरणापासून सावध रहाण्याची गरज आहे. आपण आपल्या गुणांचा, शिक्षणाचा वापर जर आपल्या देशासाठी केला तर काही प्रमाणात भारतीय संस्कृतीला लागलेला हा शापित कलंक धुवून काढायलाही मदत होईल. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून थोर पुरुषांच्या बलिदानाची परतफेड करू शकू. तेंव्हाच आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय महत्ता परिणामकारक ठरून देशाची प्रगती होईल व अापण निर्धास्त होऊन आपले आयुष्य स्वाभिमानाने जगण्यास समर्थ होऊ.