सरप्राईज
सरप्राईज
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते. हेच ' नवरस ' आपल्या कथेतून नवरात्री डायरी मध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
दिवस ७: संत्रा - संत्रा आग, तेज आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
साहित्यातील नवरस पैकी एक रस, रसिकानो तुमच्यासाठी...हास्य रस. हास्य तिथे निर्मान होतं जिथे एकतर मूर्खपणा असतो किंवा सेन्स ह्युंमर.. तर ह्या हास्य रस आणि तेज ज्ञानाचा अनोखा संगम ह्या लघुकथेतुनं सादर करीत आहे.
' हॅपी बर्थडे टू यू! हॅपी बर्थडे टू यू ! हॅपी बर्थडे डियर अनु! हॅपी बर्थडे टू यू!"
अनुने कॅन्डल्स विझवल्या आणि केक कट केला. पियु ने एक केकचा पीस अनुला भरवला आणि त्याच्या गालाला आणि नाकाला केकची क्रीम लावली.
" पियू काय करते !" अनु दूर होत म्हणाला.
" असंच मज्जा! मोबाईल देना अनु ."ती म्हणाली.
" काय एकेक करत असतेस ना तू! मला काही कळत नाही आणि.मोबाईल कशाला हवाय असुदे माझ्याजवळ. माझा मोबाइल खराब झालाय ना. वापरला एक दिवस तुझा तर काय बिघडतं .असू दे माझ्याकडेच. अजून माझा बर्थडे संपला नाही ."अनु म्हणाला.
"अरे झालं न सेलिब्रेशन! आता कोण नाही कॉल करणार तुला. " पियू म्हणाली.
मला महत्वाचे मेल करायचे आहेत ऑफिसचे. सारखा " सारखा मोबाईल मागु नकोस . थोड्यावेळाने घरच्यांचा व्हिडिओ कॉल येईल, त्यांच्याशी देखील बोलायचे मला." अनु म्हणाला तसे पियूने त्याला तोंड वेंगाडून दाखवलं.
" बरं मॅडम झालं ना मनासारखं बर्थडे सेलिब्रेश! न चल आता घरी जाऊया ." अनु म्हणाला.
" अनु एक एक आईस्क्रीम तरी." पियू हट्ट करत म्हणाली.
"अगं बाई ! आधीच किती कॅलरीज खाल्ल्यात आपण, जरा तरी विचार कर ." अनु म्हणाला.
" काय रे सारखा वजनावरून ऐकवत असतोस. खाते तर माझ्या नवऱ्याचं खाते ना , कुणाला काही प्रॉब्लेम आहे का?" पियू गाल फुगवून म्हणाली.
" बरं चला मॅडम ! आईस्क्रीम घेऊया पार्सल, घरी जाऊन खाऊया. खूप लेट झालाय." अनु म्हणाला.
" डेट्स लाईक माय स्वीट हजबंड ! " पियू अनुचे गाल ओढत म्हणाली .
दोघांनी जाताना आईस्क्रीम घेतलं .घरी गेल्यावर अनुने खिशातुन चावी काढली आणि दरवाजा उघडला पण तेवढ्यात कसला तरी आवाज आला.
"अनुsssss !" पियू मोठ्याने ओरडली.
" सो सॉरी ! मी मुद्दाम नाही केलं ." अनु म्हणाला.
पियू रागाने पाय आपटत घरात निघून गेली.
" तुझं नेहमीच आहे अनु . आतापर्यंत किती फोन घालवले तू . स्वतःचे तर स्वतःचे माझे ही फोन वाया घालवतोस . काय करू तुझं अनु ."
" अरे चुकून झालं ते . मी काय मुद्दाम केलं का ? एवढा काय इशू करते तू." अनु म्हणाला.
" मी इशू करते! मी इशू करते ! "पियू रागात लाल होऊन म्हणाली.
" एकदा बोललं तरी मला समजतं, तेच वाक्य रिपीट करायची काय गरज आहे ." अनु म्हणाला.
" तुझ्याशी ना बोलणं म्हणजे दगडापुढे डोकं आपटण्यासारखा आहे ." पियू म्हणाली .
" मग कशाला डोकं आपटतेस , आय मीन माझ्याशी बोलतेस ." अनु म्हणाला.
" बोलणार! मी दहा वेळा बोलणार !घाबरते काय तुला! चोर चोर चोर उपर से सीनाजोर ." पियू म्हणाली.
" तू मला चोर म्हणालीस पियू! " अनु रागात म्हणाला.
" म्हण आहे ती. तुला काही चोर नाही म्हणाली मी. चुकी करून ते करून वरतून तू एटीट्यूड मध्ये बोलतोस." ती म्हणाली.
" आहेच मी तेवढा स्मार्ट ! एटीट्यूड मध्ये राहणारच ." अनु स्वतःचे केस हाताने फिरवत म्हणाला.
" ओ हो हो हो! काय तर म्हणे स्मार्ट! अरे मी होती म्हणून तुझ्याशी लग्न केलं, दुसऱ्या कुणी तुला भाव पण दिला नसता ." पियू तिचे केस फुंक मारुन उडवत म्हणाली.
" ए तुझ्या सारख्या पंधरा जनी माझ्या मागे फिरत होत्या. ते तर माझे आभार मान मी तुझ्याशी लग्न केलं." अनु म्हणाला.
" हो आणि आता पस्तावले तुझ्याशी लग्न करून." पियू म्हणाली.
" काय! तुला काय त्रास दिला मी .सर्व तर तुझ्या मनाप्रमाणे करतेस ." अनु म्हणाला.
" काय माझ्या मनासारखं केलं , सांग जरा." पियू भांडणाच्या मूडमध्ये हाताची घडी घालून म्हणाली.
" घराचा कलर तुझ्या मनाप्रमाणे ! माझे कपडे तुझ्या मनाप्रमाणे! रोज जेवायचं काय तेही तुझ्या मनाप्रमाणे! माझा वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा तेही तुझ्या मनाप्रमाणे आणि विचारतेस माझ्या मनाप्रमाणे काय केलं. आठव आठव !" अनु म्हणाला.
" हो का! मागच्या वर्षी महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हा जरा दोन स्ट्रॉबेरीचे बॉक्स बरोबर घेऊन म्हटलं माझ्या मैत्रिणी वृषाली श्री आणि माधवी साठी . तर तू घेऊन नाही दिलेस ." पियू म्हणाली.
" अगं बाई ! तुझ्या मैत्रिणी राहतात किती लांब ! स्ट्रॉबेरी सर्व खराब होऊन गेली असती म्हणून मी घेतले नाही ." अनु म्हणाला.
" का रे ! मला कधी फिरायला तरी नेतोस का ! सुट्टीचा दिवस घरात लोळत पडतोस .मला कधी मदत करावीशी वाटते तुला." पियू नाराजीच्या सुरात म्हणाली.
" एक दिवस सुट्टी असते ना गं, आराम करावा वाटतो." अनु म्हणाला.
" मला तो एक दिवस देखील सुट्टी नसते . सारखं आपलं तुझ्या फर्माईशी पूर्ण करायच्या ." पियू म्हणाली.
" कोणत्या फर्माईशी!" अनु पियू कडे खट्याळपणे बघून हसत म्हणाला.
" विषय बदलू नको अनु! तू माझा प्रिय मोबाईल पाडलास , सांग आता मी कसा संपर्क करायचा माझ्या मैत्रिणींना ,मी कशा कथा लिहायच्या प्रतिलिपि वर ,माझे वाचक वाट बघत असतात माझ्या पुढच्या पार्टची, त्यांना काय उत्तर देऊ मी, माझ्या नवऱ्याने माझा मोबाईल तोडला! नाही अनु नाही ! खूप दुखावले तू मला! " पियू डोळ्यात पाणी आणून म्हणाली.
तसां अनु हसत म्हणाला .."सॉरी ना गं .कान पकडतो बाई..नवीन वर्षाचा संकल्प .मी आता मोबाईल जीवापाड जपेन जसा तुला जपतो ."
"आणि हे बघ राणी ..मी काय आणलयं ..?" हे बोलत असताना अनु खिशे चाचपडतो पण पियूचं गिफ्ट सापडतं नसतं.
पियु आपले गोबरे गोबरे गाल अजुनच फुगवुन पाय आपटत आत निघुन जाते नि धाडकन दरवाजा अनुच्या तोडांवर आपटते.बिचारा अनु वाईच्या कडकडीत थंडीत कुडकुडत राहतो.
सध्या आठ डीग्री टेंपरेचरला पन्नास डीग्री गरम डोक्याची बायको अनुला परवडणार नसते म्हणुन तो तिला मनवायला यारमचं गाण तुटक्या मोबाईलमध्ये प्ले करतो.
हम चीज़ हैं बड़े काम के, यारम
हमें काम पे रख लो कभी, यारम
हम चीज़ हैं बड़े काम के, यारम
हो, सूरज से पहले जगायेंगे
और अखब़ार की सब सुर्खियाँ हम गुनगुनायेंगे
पेश करेंगे गर्म चाय फिर
कोई ख़बर आई ना पसंद तो, एंड बदल देंगे
हो, मुह खुली जम्हाई पे
हम बजाएं चुटकियाँ
धुप ना तुम को लगे
खोल देंगे छतरियां
पीछे-पीछे दिन भर
घर दफ़्तर मैं ले के चलेंगे हम
तुम्हारी फाइलें, तुम्हारी डायरी
गाडी की चाबियां, तुम्हारी ऐनके
तुम्हारा लॅपटॉप, तुम्हारी कैप, फ़ोन
और अपना दिल, कंवारा दिल
प्यार में हारा बेचारा दिल
और अपना दिल कंवारा दिल
प्यार में हारा, बेचारा दिल
ये कहने में कुछ रिस्क है, यारम
नाराज़ ना हो, इश्क़ है यारम
हो, रात सवेरे, शाम या दोपहरी
बंद आँखों में ले के तुम्हें उंघा करेगें हम
तकिये चादर महके रहते हैं
जो तुम गए
तुम्हारी ख़ुशबू सूंघा करेंगे हम
ओ, ज़ुल्फ़ में फँसी हुई खोल देंगे बालियाँ
कान खिंच जाए अगर
खालें मीठी गालियां
चुनते चले पैरों के निशां
की उन पर ना पाँव पड़े
तुम्हारी धड़कने, तुम्हारी दिल सुने
तुम्हारी सांस सुने, लगी कंपकपी
ना गजरे बुने, जूही मोगरा तो कभी दिल
हमारा दिल, प्यार में हारा बेचारा दिल
हमारा दिल, हमारा दिल
प्यार में हारा बेचारा दिल
पण, एवढ रोमेटिंक गाण नि मध्ये मध्ये अटकत राहत त्यामुळे तर पियु अजुनच चिडते..ती सरळ गच्चीवर जाउन
अनुच्या आंगावर बँल्केट फेकत म्हणते.
नाही तु काही कामाचा
खोटा खोटा वायदा तुझा नेहमीचा
फोन माझा तु तोडतो
एकटा एकटा तु फिरतो
वरून यारमची भसाडी नक्कल करतो.
हे कविता ऐकुन तर अनुचं डोकचं सटकतं ..तसही थंडीमध्ये राग आला तर थंडी कमी वाजते ह्या फॉरमल्याचा वापर करत अनु अजुन पियूला छळण्यासाठी म्हणतो.
"हा मी नसेन काही कामाचा पण, तुझं तरी लक्ष कुठे असतं..रातराणी सारखी रात्रभर जागी असतेस , प्रतिलीपीवर लिहत असतेस, सकाळी मलाच तुला चहा करून द्यावा लागतो.."
"काय मग कोणाच्या हातचं खातोस तु ?" थांब हे घे" ..असं बोलुन अनुच्या आंगावर ती घरातला उरलेला बर्थ डे केकही आदळतो. (बिचारी पियु वाढदिवसाच्या दिवशी तरी अनुने असं नाही बोलायला पाहीजे होतं)पियूला रागामुळे पुन्हा भुक लागते आणि इकडे अनुलाही. अनुतरी बिचारा , तोंडाला लागलेला केक तरी खातो पण ,पियुला तर तेही नाही.
अनुला मग अजुनच चेव चढतो आणि तो बोलतो ,"अगं मी म्हणुन गोड मानुन घेतो नाहीतर मोदकात सारणच विसरते टाकयचं पण मी कधी बोलतो का? नेहमी हेच म्हणतो ना, किती गोड मोदक बनवते तु..बोलतो ना.. पियु .मग दार उघड ना...माझी कुल्फि होइल गं."
हे ऐकुन पियू थोडी भावुक होते कारण तिला माहीत असतं कि ती काहीही विसरली तरी अनु तिला सांभाळुन घेतो आणि मोदक म्हटल्यावर तर भुक अजुन वाढते.इतक्यातच डिलीवरी बॉयही दारावर पियुच्या आवडींचा केकही घेउन आलेला असतो.
पियु आता फुल कन्फुज झालेली असते. मनात विचार करते, "काय करू ..भांडण वाढवु कि नको.." केक तर आलाय नि भुकही लागलीय..प्रतिलीपी सिस्टर्सना कॉल करू का?त्यांनाच विचारते ..
"अरे !पण,त्या काय बोलतील ..अनुशी भांडली तेही brithdayच्याच दिवशी.त्या तर अनुचीच बाजु घेणार..मलाच झापणार त्या नेहमीसारख्या."
"पण,चुक अनुची आहे.मग मी माफ का करायचं (पियुच कन्फ्युज मन )
"तो माझा नवरा आहे .त्याला असं कुडकुडत ठेवण बरं नाही" (पुन्हा पियुच कनफ्युज मन )
इतक्यात अनु म्हणतो.."पियु आपली मुलं बघ रडत आहेत फुडसाठी त्यांच्यासाठी तरी ये गं खालती.."
मग पियुला आठवतं रात्रीचे तिचे लाडके काळु नि ब्राउनी उपाशी आहेत..ती लगेच डॉग फुड घेउन जीने उतरत खालती आली.
तिला पाहुन अनु मनात म्हणाला, "भले थोडी विसराळु भले थोडी सेंटी नि कनफ्युज पण सोन्याच्या ह्द्य असलेली माझी लाडाची सखी ती."
पियुही अनुच्या लाजण्याने लालेलाल होते , चला भांडण मिटलं असं अनुला वाटतं असतानाच पियु झटक्यात त्याला लांब ढकलते नि म्हणते.
"मी काय तुझ्यासाठी नाही आली , तु माझं गिफ्ट विसरलास ..वरतून माझाच फोन तोडलास..तुला काय वाटलं मी माफ करेन ?"
एवढ बोलुन ती लाडाने आपल्या लाडक्या पण भटक्या कुत्र्यांना खाउ घालते नि नाक उडवत अनुच्या हातचा केक घेउन परत आत जाताना अनु तिला रोखतो नि झटक्यात जवळ ओढतो.
इतक्यात खो खो करून काही आवाज अनु नि पियुला ऐकु येतात नि अनु धाडकन पियुला सोडुन देतो नि बिचारी जमिनीवर पडते..बिचारी पियु..अनुने आज सगळच पाडायचं ठरवलंय वाटतयं.
अनु तिला तसाच सोडून गेटवर पुढे जाऊन बघतो तर वृषाली, मधू आणि श्री त्यांना सरप्राईज द्यायला त्यांच्या घरी पोहोचले होते. अनु ने गोड हसून अगदी लाजून त्यांचं स्वागत केलं. पियू मात्र अजून अजून ही उंबरठ्यावर ठाण मांडून बसली होती. बसली काय..! बिचारीला इतकं जोरात लागलं की उठताच येईना.
" पियू काय हे..! उठ... बघ तुझ्या फ्रेंड्स ची आठवण काढली आणि त्या आल्या सुद्धा.." अनु तिला हात देत उठवत म्हणाला.
पियू मात्र गाल फुगवून अनुकडे मारक्या म्हशीगत बघत होती. तिला वाटलं तो गम्मत करतोय पण तितक्यात समोर वृषाली तिला दिसली.
आणि इतक्यात कंबर मोडलेली पियू खाडकन उठून उभी राहिली आणि " अय्या , तायू... तू.. आता..इकडे.. ओह माय गॉड..." तशी वृषालीच्या गळ्यातच पडली.
" अहम्म..." श्री आणि मधू ने घसा खाकरला. जणू निर्देश दिला की आम्ही पण आहोत.
श्री.. मधू च्या जवळ आली... मधू ची गळाभेट झाली आणि श्री ची घेणार पण पियू पण मोटु आणि श्री पण.. दोघींची ढेरी गळाभेटीत आड येत होती. तसे सगळे जोरावर हसू लागले.
आता पुन्हा पियू चा फुगा फुगला... तुम्ही सगळे आम्हाला हसलात म्हणून..
" चिल बेब... हा विचार कर की आपल्या मूळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलून त्याच आरोग्य आणि आयुष्य वाढत.."
" हम्मम... बरोबर बोललीस श्री.."
" ओह मॅडम..! आता उंबऱ्यातच उभं राहायचं की आत पण जायचं..." मधू म्हणाली.
" हो हो चला...!" तस पियू ने अनु कडे गोड कटाक्ष टाकला की अनु डार्लिंग आता आमच्या मैत्रिणी च्या पाहुणचार च बघ.. आणि थोडं नौटनकी करत म्हणाली, " आई ग..! तायू... खूप जोरात पडली ग मी..! कंबरच मोडली माझी.. "
"आईग..! माझी लाडाची बाय ती..!" वृषाली ने तिला सोफ्यावर बसवत डोक्यावरून हात फिरवला.
"वर्षेभर तर धडपडत असते..कधी बाथरूम मध्ये तर कधी स्टूल वरून.. कधी हा पाय प्लास्टर मध्ये तर कधी तो.." श्री म्हणाली.
तशी मधूने श्री ला शांत बसायला इशारा केला.
" अरे पियू आम्ही का पाहुण्या आहोत का..! असू देत.. बस तू आराम कर.." मधू म्हणाली.
"अरे अस कसं..! इतकं दुरून आलात तुम्ही..! मी आहे ना.. येत मला सगळं..!" अनु मधेच म्हणाला.
त्याने लगेच ट्रे मध्ये पाण्याचे चार ग्लास भरून घेऊन आला आणि सगळ्यांना देऊन टी पॉय वर ट्रे ठेवला.
पुढच्या पाचच मिनिटात इतका सुंदर आल्याचा चहाचा सुगंध आला की सगळ्यांच लक्ष आपोआप किचन कडे गेलं.
"पियू तू घर किती मेंटेन ठेवलंय.." मधू म्हणाली.
" छह्या... हे अनु दादा ने ठेवलं असणार..! मॅडम तर दहा वाजेपर्यंत साखर झोपेतच असतात.." श्री लगेच अनुच संवेदन पत्रक घेऊन आली.
पियू चा फुगा परत फुगला.
" मधू..! हिला काही माहिती नाही.. मी पण करते घरात काम हं..!" पियू श्री कडे रागाने एक कटाक्ष टाकत म्हणाली.
" नाही ग.. सगळं पियुच करते. अनु तिला काहीच हेल्प करत नाही. बिचारी पियुच एकटी सगळं करते. अनु तर त्याच ऑफिस च काम पण पियुकडून करुन घेतो. काही येत नाही अनु ला.. यू नो व्हॉट पियू... यू डीझर्व बेटर डॅन हिम..!"
वृषाली मुद्दाम अनु ची बुराई करते जेणेकरून पियू ला अनु चा कणव येईल. आणि झालं ही तसच.. तिचा निशान एकदम योग्य ठिकाणी लागला.
" ए तायू.. नाही हा..! माझा अनु खूप गोड आहे. किंबहुना त्याच्याशिवाय मला कुणीच झेलू शकत नाही. सकाळी बेड टी देतो. माझी खूप काळजी घेतो. सगळ्या कामात मदत करतो..." आणि जो पियू च अनुपूराण सुरू झालं तर ते पंधरा वीस मिनिटे तसच सुरू होत..
आणि अद्रक चा चहा जळण्याचा वास येऊ लागला.
" ए कायतरी जळतंय बर का..!" श्री ला वास येऊ लागला.
" तुझीच जळत असेल की माझ्या कडे का नाही अनु हिच्यासारखा.." पियू तोंडावर हात ठेवून खिदळत होती.
" ए मक्ख..! किचन मध्ये बघ.." मधू म्हणाली.
तशी मधू घाईने किचन मध्ये गेली आणि बघते तर अनु भिंती आडून पियू च अनुपूराण ऐकत मुग्ध झाला होता आणि एकटक पियू कडेच बघत तिथेच भिंतीजवळ उभा होता.
" अनु दा..! अहो अनु दा..!" मधू ने आवाज दिला. तरीही अनुची भोवळ काही उतरेना. मग तिनेच जाऊन गॅस बंद करून टाकला.
" अनु..s..sss.!" पियू आता जोरात ओरडली तेव्हा कुठं त्याची तंद्री भंग पावली.
हसून हसून त्या तिघींची मुरकुंडी वळली होती. पियू मात्र राखुमाई सारखे कमरेवर हात ठेवून दुर्गेगत जळजळीत आग अनुवर ओकत होती. बिचारा अगदी गरिबासारखा तिच्यासमोर कान पकडून उभा होता.
" अनु दा...! पियू..! असू दे रे तो चहा... चला आधी आपण मस्त केक कट करून खाऊ ..." वृषाली त्यांचं विकोपाला जाणार पण न गेलेलं भांडण सावरत म्हणाली.
श्री आणि मधू ने हॉल मध्ये बर्थ डेची तयारी सुरू केली. आणि अनु ही फुगलेल्या पियू ला मनवत त्याची गिटार घेऊन आला आणि वृषाली गाऊ लागली.
ओ प्रिया ओ प्रिया प्रिया तुम सा नहीं कोई प्रिया
तू खुश रहे जहां भी रहे ये मेरे दिल की दुआ ओ
ओ प्रिया ...( वृषाली )
तुम को मिल गया साथी प्यार का
हमसे छिन गया दामन यार का
कहना बहुत है लेकिन घड़ियां आज हैं कम
तेरी हर बात वो पहली मुलाकात हमको रुलाएगी तेरे बाद
ओ प्रिया ... ( श्री)
मिलना बिछड़ना उसके हाथ है
बनना संवरना किस्मत की बात है
कठपुतली हैं हम सारे कर ले तू यकीं
दिलवाले कभी माने नहीं हार कर ले तू भरोसा मेरे यार
ओ प्रिया ... (अनु दा - मधू)
अपने दिल की बात कह दी सभी ने
मेरे दिल की बात न जानी किसी ने
तुम क्या हमारे हो ये कोई जाने ना
बीते हुए पल वो हँसता हुआ कल कैसे भूल पाएंगे भला
ओ प्रिया ... ( अनु दा)
तिघीनी ही अनु दा ला साथ देत गात होत्या. पियू तर अगदी सातव्या आसमंतात गेली.
आणि बर्थडे क्रॅकर फोडून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पियू आणि अनु ने केक कापला. दोघांनी एकमेकांना भरवला. मग पियू ने तिघीनी छोटासा पीस दिला आणि बाकी सगळा एकटच समोर घेऊन खाऊ लागली.
" तायू खूप भूक लागली होती ग..! माझं झालं की देते तुम्हाला.." पियू म्हणाली.
" ठीक आहे खा तू..! गिफ्ट आम्ही ठेवतो मग..!" वृषाली तिच्या बॅग मधून दोन चौकोनी बॉक्स समोर ठेवत म्हणाली.
" हो... मग हे गिफ्ट आपण आपल्यालाच ठेवू केक नाही मिळाला तर.." मधू अजून दोन बॉक्स काढत म्हणाली.
" मधु..! अस ही ह्या गिफ्ट ची गरज तर अनु दा ला जास्त लागते.. ते सारख त्यांचीच ही वस्तू सारखी खराब होते. " श्री ने अजून दोन बॉक्स बाहेर काढले.
आता पियू ने मात्र केक बाजूला ठेवून एक नजर केकवर फिरवली आणि म्हणाली, खा तुम्ही पण.. अनु तू पण खा... " आणि बेसिन मध्ये हात धुऊन पुसून घाईने सोफ्यावर येऊन बसली.
आणि तिने वृषाली च्या हातून बॉक्स घेऊ लागली.
" आंह... हे अस नाही मिळायचं...! " वृषाली म्हणाली.
"मग.." पियू प्रश्नांकित नजरेने बघत विचारलं.
" अक्कड बक्कड करावं लागेल." मधू तिला कन्फ्युज करत म्हणाली.
"म्हणजे मला नाही समजलं, कॅन यू प्लिज एक्सप्लेन.." पियू तिच्या नेहमीच मोड मध्ये आली.
" म्हणजे हे सहा बॉक्स पैकी तुला दोन बॉक्स निवडायचेत , एक अनु दा साठी आणि एक स्वतःसाठी..!"
तिने वृषाली चा दोन्ही बॉक्स वर हात ठेवले. कारण वृषाली तिला कधी छेडत नाही. नेहमी तिचे लाड करते.
आणि दोन्ही बॉक्स च रॅपर काढून बॉक्स बघते तर त्यावर i Phone 13-pro च बॉक्स बघून तर अगदी हवेतच उडू लागली. तिने एक्ससाइटमेंट मध्ये अगदी उड्या मारू लागली आणि वृषाली ला गालावर गोड पापा दिली...
श्री आणि मधू मात्र तिची ही रेअकॅशन बघू न गालात हसत होत्या.
तिने बॉक्स खोलला तर त्यात रेड कलर च मस्त अँपल होत. सगळे जोरात हसू लागले. अनु दा तर अगदी मधूच्या हातावर टाळ्या देऊन हसत होता.
आणि मॅडम च हिरमोड झाला. पियू ने अनुकडे रागाने बघितल आणि वृषाली कडे एक नजर बघून डोळे भरून गाल फुगवून बसली. मग सगळे शांत झाले.
" अरे यार... तू लगेच नाराज होतेस. हे बघ... हे पण तुझंच गिफ्ट आहे. " मधू म्हणाली.
पण पियू काही हात लावेना. शेवटी सगळ्यांनी विनवणी केली तेव्हा तिने मधू ने बॅग मधून काढलेला बॉक्स च रॅपर खोलून बॉक्स बाहेर काढला. Samsung M52 बघून ती खुश झाली पण ह्यावेळी उड्या न मारता मधू ला थँक्स बोलून बॉक्स उघडला.
आणि त्यात जत्रेतील चल छईया छईया वाला बेबी पिंक कलरचा लहान मुलांचा मोबाईल बघून रडूच लागली. आणि उठून खिडकीत हाताची घडी घालून उभी राहिली. सगळे हसत होते पण थोडं हळू...
" माझा वाढदिवस आहे आणि आज सगळे मला छळायलाच आलेत..." ती स्वतःशीच पुटपुटली.
" तसा अनु तिच्या समोर गुढघ्यावर टेकून हातात अंगठीचा बॉक्स तिच्या पुढ्यात घेऊन बसला.
वृषाली ने फुलदाणी मधून एक लाल गुलाब अनु कडे देऊन पियू ला देण्यासाठी दिल. तसा पियू चा फुगा फुटून गोड हसली. अनु हातात गुलाब फिरवू लागलो एकदा फुलांकडे आणि एकदा तिच्या डोळ्यात बघतो
लाट उसळोनी जळी खळे व्हाव
त्यात चंद्राचे चांदणे पडाव
तसे गाली हासता तुझ्या व्हाव
तुझे मुख्कमली गुलाब बहराव...
गाणं मनातलं पावसात फुलावे
तुझ्यामाझ्यातलं अंतर पुसूनी जावे
बीज नवीन गाण्याचं तुझ्या ओठी पेराव
गुलाब होऊन काट्यांवर बहराव...
मन माझे कळीगत उमलून जाव
स्पर्श तुझा गुलाबी गालांचा होताच
प्रीतिचा बहर बघ यावा
क्षण हे तुझ्या सोबतीचे गुलकंद व्हावं...
" तुला तर सापडत नव्हत ना गिफ्ट...! पण नाही... माझा अंत पाहूनच दम घेतोस तू.. " पियू लटक्या रागात म्हणाली. त्याच्या हातून गुलाब अगदी हिसकावून घेतलं तिने.
आणि लाजून तिने तिचा हात पण पुढे केला. त्याने अलगद तिच्या डोळ्यांत बघत तिच्या बोटात अंगठी अलगद चढवली.
सगळ्यांनी हुहू करत टाळ्या वाजवून दोघाना विश केलं.
आणि शेवटी वृषाली ने राहिलेले दोन बॉक्स पियू ला देऊ लागली.
"ए नाही हा..! आता मी काही फसणार नाही... त्यात तुम्ही अजागळ पोरी आता दगड सुद्धा टाकून आणू शकतात. माझा पूर्ण विश्वास बसलाय.."
आणि तिच्या मागे घेऊन तिघी ही घरभर फिरू लागलो. पियू पुढे आणि तिघी ही तिच्या मागे... आणि असच फिरता फिरता अनुला धडकली. आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवले.
मी मला तुझ्यात विसरावे
तू मला तुझ्यात गुंतवावे
भावनांना माझ्या सावरावे
शब्द मनातले आवरावे
रूप दर्पणी भिन्न दिसे मज
हृदय मंदिरी तूच असावे
ओली वाळू होई रूपेरी
सागर लहरीनी नाचावे
नकळत पियूच्या बोलक्या डोळ्यांनी अनुच्या प्रेमळ डोळ्यांना ताब्यात घेऊन एकमेकांत हरवून गेले. आणि हे काही भानावर येत नाही बघून श्री , मधू आणि वृषाली ने तो मोबाईल चा बॉक्स तिथेच टेबलवर ठेऊन कल्टी मारली.
