Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

किशोर राजवर्धन

Romance Tragedy

5.0  

किशोर राजवर्धन

Romance Tragedy

अपेक्षा

अपेक्षा

6 mins
1.1K


या कथेतील सर्व पात्रे ,प्रसंग काल्पनिक असून त्यांचे कोणाही जीवित वा मृत व्यक्तींशी साम्य आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग मानावा.

या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रन वा नाट्य चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.


तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल ठेवलेली अपेक्षा काही दिवसापूर्वीच आपल्या मामाच्या घरी आली होती. पण तीचा स्वभाव जरा शांत आणि गप्प-गप्प होता. तीच्या चाळीतल्या काही मुलींशी थोडी मैत्री होती.

     प्रज्योत सडपातळ बांधा, सावळा वर्ण, त्याच्या मनमोकळा स्वभामुळे तो सर्वांना आवडत असे. त्याचा हा स्वभाव हे त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे एक उदाहरणच होते. तो ज्या ठिकाणी जात असे, तेथे त्याच्या या स्वभावांनी तो निघुन गेल्यावर आठवणी तयार होत असे. मित्रांन मध्ये तो कधी नसला तर त्याचे मित्र त्याच्यासाठी कावरे- बावरे होत असे जसे की तो त्यांच्या मैत्रीचा जिव्च होता. तो चाळीतल्या मित्रांन सोबत दररोज चाळीच्या बाहेर चर्चा, मस्करी करत उभे राहात असे.

आज ही या सर्व मित्र मंडळीची अशीच चर्चा - मस्करी रंगात आली होती. (हिवाळ्यातील थंडीची सकाळ सरली होती. थंडीच्या दिवसात कोमल सुर्य प्रकाश अंगावर झेलुन घेणे म्हणजे एक आनंदमय सुखंच आहे. हे सुख घेत असताना प्रज्योतची नजर क्षणभर एका दृष्यावर स्तब्ध उभी राहीलि.............अपेक्षा आपले धुतलेले केस पुसत बाहेरच्या अंगणात उभी होती. तीच्या यैवनाकडे तो पाहातच होता. त्याचे मित्र त्याच्याकडे पाहात होते. तेवढ्यात .......सुधीरने त्याला त्याच्या स्वप्न सुंदर दुनियेतुन बाहेर खेचुन आणावे तसे त्याने त्याला जोरात हलवले.) त्याचे मित्र त्याला चिढवु लागले. कामाला जाण्यास वेळ होईल म्हणून त्याने तिथुन पळ काढला. तो स्टेशनला येऊन लोकलची वाट पाहत उभा होता.....(त्याच्या डोळ्या समोर सकाळी घडलेलं दृष्य त्याला आठवुन आठवुन स्वस्थ बसू देत नव्हतं......................रेशमी काळ्या केसांन मधला तो अपेक्षाचा सुंदर चेहरा त्याचा पाटलाग करत होता.) तो ठरलेल्या लोकल मध्ये चढला पूर्ण प्रवास तो अपेक्षाचाचं विचार करत होता. नंतर त्याने स्वत:ला सावरले त्याला वाटलं हे नुसतं आकर्षण असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केले. अपेक्षाच्या विचारात दिवस कधी मावळला हेही त्याला कळलं नाही. तो घरी आला व दररोज प्रमाणे मित्रांन सोबत चाळी बाहेर चर्चा - मस्करी करत उभा होता. पण आज तो जरा गप्प आणि मनाने कुठेतरी हरवलेला होता. त्याच्या मित्रांना आश्चर्य वाटत होते की, दररोज आपल्या सोबत मस्करी करणारा प्रज्योत आज शांत का ?.... म्हणून त्याला सकाळच्या घटने बद्द्ल चिडवत असताना त्याच्या ह्द्याच्या काही तारा छेडण्याचा प्रयत्न केला आणि काही तारा तर अपेक्षाच्या नजरेनेच तोडल्या होत्या........................त्या दिवसापासून प्रज्योत अपेक्षाच्या प्रेमात न थांबणा-या पाण्याप्रमाणे वाहू लागला. त्याला समजावण्यासाठी कोणीही तयार नव्हते आणि तो ही ऐकून घेण्यास तयार नव्ह्तां. तो दररोज चाळीच्या बाहेर उभा राहुन अपेक्षाला पाहतं असे तो दिवसेंदिवस अपेक्षाच्या प्रेमात बैचैन होत होता. कधी तिला पाहण्यासाठी कामातुन लवकर घरी येई, तर कधी कामाला न जाण्याचे वेगवेगळे बहाणे बनवू लागला. त्याच्या या वागण्याकडे पाहुन सुधीरने त्याची बैचैनी दुर करण्यासाठी चाळी तील त्याची मैत्रिण वृक्षालीला प्रज्योतच्या प्रेमा बद्द्ल सांगितलं.

तसेच प्रज्योत आणि वृक्षाली हे दोघेही चांगले मित्र होते. वृक्षालीने ही प्रज्योतच्या वागण्यात काही दिवसात झालेला बदल जाणवला होता. पण तिला आज सुधीर कडून कळले होते. वृक्षाली ही अपेक्षा सोबत चांगली मैत्री झाली होती. म्हणून सुधीरने वृक्षालीला प्रज्योत आणि अपेक्षाला एकांतात भेटण्यास तयार सांगितलं. वृक्षाली विचारात पडली की, एका बाजुला तीच्या चाळीतील मित्र तर दुसरी कडे नुक्तीच काही दिवसापुर्वी अपेक्षा सोबत झालेली मैत्री या विचारात वृक्षालीला निर्णय घेण्यास कठीण जात होते. कारण तीला प्रज्योतची काळजी वाटत होती आणि अपेक्षाचा स्वभाव ठाऊक होता की, तीच्या भेटायला तयार होणार नाही........ आणि तीच्या मनात जर प्रज्योत बद्द्ल प्रेम नसेल तर...........आणि तिने तिच्या मामाला सांगितले , तर प्रज्योत वृक्षाली, अपेक्षा यांच्या घरच्या संबंधामधे तडा निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणून वृक्षालीने अपेक्षाला फक्त एवढचं सांगितल की, "एक मुलगा तुझ्यावर प्रेम करतो, त्याला तुला भेटाचं आहे." तीने रागात विचारलं "कोण आहे तो ? " आणि " मी भेटणार नाही " तिचे हे शब्द ऐकून वृक्षालीने हे जाणलं की, तीच्या मनात प्रेमा बद्दल राग आहे. म्हणून वृक्षालीने हा विषय तिथेचं थांबवला.........................अपेक्षाला प्रज्योत बद्द्ल काही माहीत नव्हतं दररोज चाळीच्या बाहेर उभा राहून तिच्याकडे पाहतं राहणा-या त्या मुलाचं नाही तिला ठाऊक नव्हतं.

दिवस आपल्या नियमाप्रमाने रोज पुढे पाऊल टाकत होतं..........आणि प्रज्योत अपेक्षाच्या प्रेमात गुंतत होता. त्याच अबोल प्रेम व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधत होतं. दररोज प्रमाणे प्रज्योत आज ही चाळीच्या बाहेर उभा राहून अपेक्षाकडे एकटक पाहतचं होता. अपेक्षाला हे दररोजचं आहे हे तिला कळून चुकलं होतं तीने आज निश्चय केला होता की, आज त्याच्या समोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणाय्चं की, " मला मनसोप्त पाऊन घे " आणि.......तिने त्याच्या कडे वाटचाल सुरु केली..........तेवढ्यात त्याच्या मित्रांनी त्याला जोराची हाक मारली....." प्रज्योत..!" तेवढ्यात प्रज्योतने अपेक्षाच्या स्वप्नातुन गडबडत त्या आवाजाकडे पाहिलं आणि तो त्यांच्याकडे जाण्यास वळला................... प्रज्योत ने वळून पाहिलं अपेक्षाची पावलं त्याच्या कडे येण्याची थांबली होती.................................पण अपेक्षाला आज त्या मुलाचं नाव कळलं होतं. काही दिवसांनी अपेक्षाला ही कळलं की , वृक्षालीने तिला ज्या मुला बद्द्ल सांगितल होतं. तो मुलगा प्रज्योतच आहे.

पाहूनी म्हणून आलेली अपेक्षा दोन दिवसांनी तीच्या घरी जाणार होती. चाळीची संस्कृती ही अशी असते की, एकाच्या घरातील घडणा-या घडामोडी आजच्या सॅटलाईट प्रेक्षेपणापेक्षा ही जलद बातमी देतात. त्यामुळे हे प्रज्योतला कळलं होतं. प्रज्योतने वृक्षालीला सांगितल की, एकदा तरी भेटण्यासाठी ये म्हणून ............... वृक्षालीने अपेक्षाला ही हकीकत सांगितली..........अपेक्षा हे सर्व ऐकत होती. प्रेम क्षणभर तिच्या मनाला स्पर्श करुन गेलं.. पण ती अजुन ही शांत होती.

दिवस मावळल्या नंतर आजची रात्र या दोन ह्द्याची परीक्षेची रात्र होती. अपेक्षा ही प्रज्योत बद्दल विचार करत होती. पण तिने हे ग्राह्य धरलं होतं की, प्रेम जे मृगजळ आहे ते फक्त दु:ख आणि आठवणी शिवाय काही देत नाही. आणि जर तिने होकार दिला तर मामाच्या आणि आईच्या नात्यात दुरावा निर्माण होईल...............................

ईकडे प्रज्योत अपेक्षाच्या उत्तराची अतुरतेने वाट पाहतं सकाळी होई पर्यंत अपेक्षाच्या स्वप्नात रंगला होता...............................

आजचा दिवस प्रज्योत आणि अपेक्षासाठी जीवनाच्या निर्णयाचा दिवस ठरणार होता. प्रज्योत आज अपेक्षा समोर आपल्या प्रेमाचा वर्षाव करणार होता आज त्याने अपेक्षासाठी गिफ्ट , फुलं घेतले आणि तो संध्याकाळची वाट पाहू लागला.....................

संध्याकाळ सुरु होत होती सुर्याने पश्चिमेला वाटचालं सुरु केली.......... प्रज्योत चाळीच्या समोर असलेल्या फुलझाडांच्या कुशीत अपेक्षाची वाट पाहत्म होता.........सुर्याने प्रज्योतला शुभ संध्याकाळ ...! म्हणून तो निघुन गेला आणि चंद्र नुकताच उगवला. प्रज्योत अपेक्षाची वाट पाहतं होता................पण, अपेक्षा त्याच्या या अपेक्षाभंगाच कारण बनली..............ती आलि नाही. ..................... प्रज्योतने त्या फुलझाडांच्या कुशीतुन सर्वत्र पसरलेल्या काळोख्या आकाशाकडे पाहीलं ते आकाश चांदण्यानी भरले होतं त्याला त्या भरलेल्या आकाशात फक्त अपेक्षाचं सुंदर रुपचं दिसतं होत. पण त्याचा चंद्र अजुन ही उगवला नव्हता. त्याच्या मनात उठणा-या वादळांना तो गोठवू लागला त्याच्या आणि सुख - दु:खाच्या ओढाताढीत प्रज्योतच्या पदरी फक्त दु:खच ओढून आलं.

ईकडे अपेक्षा प्रज्योतला न भेटता निघुन गेली होती.............................

(आयुष्यात जी स्वप्न त्याने त्याच्या पहिल्या प्रेमासाठी पाहिली होती. ती सर्व त्याने अपेक्षाच्या प्रेमात त्याग केली. त्याच्म दु:ख तो विसरु शकत नव्ह्ता व बोलूही शकत नव्हता. त्याने अपेक्षासाठी घेतलेलं गिफ्ट आणि फुलं अपेक्षाच्या प्रेमाची आठवण राहावी म्हणून तसचं ठेवलं)

     त्या दिवसा नंतर त्याने आयुष्यात कधी ही प्रेमाची पायरई चढायची नाही हा निश्चय केला. आयुष्यात जेवढे दु:ख मिळतील तेवढे सुख समजुन पित गेला. अपेक्षा कडून त्याने कधी ही प्रेमाची अपेक्षा केली नाही.......... आणि त्याची अपेक्षा ही "एक कधी न पूर्ण होणारी अपेक्षाच राहिली. "



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance