STORYMIRROR

Ameya Dhumal

Romance

4  

Ameya Dhumal

Romance

तू अशी, कि तू तशी...

तू अशी, कि तू तशी...

1 min
456

तू अशी,

कि तू तशी...

तुज ओळखता मज येईना,

खोल मनातून रुजलेले

प्रेमांकुर तुज दाखवताही येईना!!!

 

अस्मानीच्या कृष्ण मेघांपारी तव कुंतल,

तव नयन जणू जलपरीसम चंचल,

चैत्राची शीतल पालावी सम आचल,

तुझी एकच याद करी

मजला घायळ...

 

कधी वाटते....

होऊनी वारा झुळूकावे तुझियाच भवती,

तव गंध पसरावा जगभर

कस्तुरीच जणू अवती-भवती....

 

तव केसांत हरवूनी जावे,

तव अश्रूंत विरघळुनी जावे ,

तव शब्दांत जग विसरावे,

तव डोळ्यांत आयुष्य वेचावे,

जरी असे मजला वाटत असते,

परीकथेतील परी एक तू

हे मनोमन ठाऊक असते....

 

न जाणो कळेल कधी तुला,

कवी एक वेद होऊनी गेला....

तुजसाठी जन्मला,

तुजसाठी जगला 

अन

तुजसाठीच मेला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance