माझं तुझ्यावर प्रेम नाही...
माझं तुझ्यावर प्रेम नाही...
आता हल्ली तुझी ओढ
पूर्वी इतुकी वाटत नाही,
तुझ्या आठवणीने या
डोळ्यांत पाणीही दाटत नाही,
तुझ्या सोबत नसण्याचं हे
शल्य मनात काही उरत नाही,
पण याचा अर्थ असा नव्हे
कि माझं तुझ्यावर प्रेम नाही...
माझ्या घरासमोरचा गुलमोहर
काही केल्या मोहरत नाही,
हल्ली गुलाबाची कळीदेखील
पूर्वीसारखी उमलत नाही,
पहिल्या पावसाची सर
मला आता भिजवत नाही,
पण याचा अर्थ असा नव्हे
कि माझं तुझ्यावर प्रेम नाही...
हल्ली नजर या गर्दीत
आता तुला शोधत नाही,
तुझ्या घराकडे जाणारी वाट
मात्र काही केल्या चुकत नाही,
म्हटलं जरा एकट जगून बघावं,
तुझ्या शिवाय मला ते हि जमत नाही,
पण याचा अर्थ असा नव्हे
कि माझं तुझ्यावर प्रेम नाही...
