STORYMIRROR

Ameya Dhumal

Romance Others

4  

Ameya Dhumal

Romance Others

आसवांचा पाउस

आसवांचा पाउस

1 min
46

झाकोळतं आभाळ,

बरसतात सरी,

अव्यक्त भावना

दाटतात उरी।

कोसळतो पाऊस,

शहारते माती,

बेधुंद मनाला,

आवरायचंं किती!

उमलते पालवी,

बहरतो निसर्ग,

हरवला धुक्यात

परतीचा मार्ग!

चमकते वीज,

सैरभैरतो वारा,

घरामध्ये, तुझ्याच

आठवणींचा पसारा!

वेडावतो समुद्र,

उधाणतात लाटा,

विसरायच्या कशा

ओळखीच्या वाटा!

जाणवतो स्पर्श,

हुरहुरते काया,

मिटताच डोळे

ओघळते माया!

थांबतात श्रावणसरी,

भोवताली गारवा,

अंधारात चमकतो

पुनवेचा चांदवा!

बदलतो ऋतु,

झळाळते इंद्रधनुष्य,

आसवांचा पाउस

विस्कटतो आयुष्य।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance