"बा भिमा शतशत नमन"
"बा भिमा शतशत नमन"
"बा भिमा शतशत नमन"
!
क्रांतीचा सुर्य, महुच्या मातीत उगवला।
अस्तास जावुनी,चैत्यभुमीत मावळला।
मावळण्या आधी बा भिमा।
भारत भू वर धगधगला।१
।
क्रातीची तया आग होती निराळी।
प्रतिक्रांतीची तलवार जवळी।
नाही ठिणगी,मशाल होती धगधगती।
भिममाउली ती होती दुबळ्यांची।२
।
रात्रदिन तो माणुसकीसाठी झटला।
जागला लेकरांसाठी लढून पेटला।
लंडनच्या दरबारात सिंह गरजला।
राजा रंकाचा ही माथा झुकला।३
।
गुण गौरव गावे केवढे।
पुष्पांजलीस शब्द पडले अपुरे।
माथा झुकवी मी युगंधरापूढे।
बा भिमा शतशत नमन पहिले।४
।