शूरांचे बलिदान
शूरांचे बलिदान
शूरांचे बलिदान
ऊरी आण देशातल्या
आसवांना पुसण्याची
आई तुझ्या कुशीतल्या
देशभक्त जवानांची !!१!!
नपुंसक ,नीच ,दृष्ट
भ्याड हल्ला पुलवामा
क्षणातच विसावला
रक्षकांचा लवाजमा !!२!!
दृश्य पाही विदारक
रक्त,मांसाच्या चिंधड्या
पाषाणास फुटे अश्रू
छाती घायाळ निधड्या !!३!!
दान सौभाग्याचं देता
श्वास श्वासात कोंडले
अभिषेक करण्यास
रक्त शूरांचे सांडले !!४!!
भ्रष्ट सैतानांची मतीस
नाही पर्वा जीवितांची
वचनांना शपथ ह्या
शौर्यकथा हुतात्म्यांची!!५!!
भूक सुडाची पेटली
तिरस्कार ओकणारी
ज्वाला ही प्रतिशोधाची
माणुसकी छेदणारी !!६!!
मातृभूच्या पदराला
जर तू लावला हात
पाकच होता की,खाक
याद कर अश्रू गात !!७!!