मी.... ती
मी.... ती
मी आत्ताच श्वास घेतलाए, उरात आनंद पसरलाए.
होय मला सुद्धा समुद्रात झेप घ्यायचीए, ढगात खेळायचाय.
सप्तरंगी इंद्रधनुष्याचा एक रंग चोरून, ह्या ब्लॅक अँड व्हाईट विश्वाला रनागवाईचय.
आजी च्या मांडीत बसून वरण-भात खायचाय, बाबांच्या पाठीवर घोडा घोडा करायचंय.
आणि ते माझे लाडके पप्पा, त्यांचा बोट धरून चॉकलेट-गोळ्या घ्यायची जिद्द करायचीए.
पण हे काय आजीची मांडी हरवली... पप्पानचा बोट दिसेनासा झालाए.
आणि बाबा ते ता अगदी ताठच झाले...त्या सगळ्याला मी नकोशी ए.
का त म्हणे मी एक मुलगी आहे?
दादाचे किती लाड होतात... पण माझी चाहूल लागताच का माझा जीव घेतात?
आता राहिली आई तू... मला माहिते की तुला मी हवी हवीशी आहे.
पण तू तरी काय करणार? जशी मी तशी तू पण एक स्त्रीच आहे ना...
तुझी हाक कोण ऐकणार? जाऊ दे डोळ्यात पाणी आणू नको...
मनाला घट्ट कर, मी जाते त्या ढगात खेळायला,
माझ्या सारख्या सोबती शोधायला. अग रडू नकोस ग,
मी पाहिल ना तुला वरून, आणि सांगेन त्या देवाला ,
की ह्यावेळी तरी तिचे डोळे भरू देऊ नकोस...
बस टाक एक मुलगा तिच्या पदरात.