STORYMIRROR

Mangesh Medhi

Romance

3  

Mangesh Medhi

Romance

तुला पाहण्या

तुला पाहण्या

1 min
18K


तुला पाहण्या ही ओढ जीवा लागली

वाटा परतीच्या धावे तुला भेटण्या


आतुर या शिणल्या मना, तुझ्या साथीने मिळे विसावा

झलक रुपाची खुणवे मला, इथे दिसेना तिथे दिसेना


तुला पाहण्या ही ओढ जीवा लागली तुला पाहण्या


आपल्याच हक्काची प्रेमरसे बुडण्याची

विसर सारा पाडीसी ही वेळ मधु भेटीची


तुला पाहण्या


मधुर तुझ्या वचनांची अल्हाद सलगीची

क्षणे सारे जगण्या मदहोश नजर बंदी


तुला पाहण्या


ओढ तुलाही आतुर ही भेटण्या

झुगारुन बंध धावे मला बिलगण्या


तुला पाहण्या


मस्तीच्या उसंती कटिबंध भटकंती

जीव जीव गुंफुनी मन झुले तरंगी


तुला पाहण्या ही ओढ जीवा लागली

वाटा परतीच्या धावे तुला भेटण्या



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance