STORYMIRROR

Amol Shinde

Tragedy

3  

Amol Shinde

Tragedy

पहावं वाटतंय गं तुला

पहावं वाटतंय गं तुला

1 min
592

अगं ऐक ना 

तू जेव्हा हसतेस 

खूप छान दिसतेस

पहावं वाटतंय गं तुला


कधी येशील तू 

वाट पाहतोय तुझी

त्या वाटेवर जिथं तू अन् मी एक व्हायचो

सारं काही विसरून जायचो

येशील म्हणून आजही वाट पाहतोय

शरीर राहीलं नाही पण

आत्मा अजून आहे तिथेच


कारण वेदना आणि प्रेम 

यांनी सोडलंच नाही मला


माझं जाऊ दे तू सुखी आहेस न बस्स...

आपलं काय तेव्हा उनाड होतो

आताही उनाडचं आहे फक्त तू नाहीस

आता फक्त वारा असतो सोबतीला

तो ही तुझी आठवण करून देतो

म्हणून मी पण बोलत नाही त्याच्याशी

माहीत असून ही खेळ करतो माझ्याशी


कारण वेदना आणि प्रेम

यांनी सोडलंच नाही मला


बघ आता खूप दिवस झाले

करमतही नाही एकटं एकटं राहून

तू येण्याची वाट वेडी पाहून

तुझं सोडून जाणं 

चटका देऊन गेलं मनाला

म्हणून आतून जळत होतो

सांगितलं नव्हतं मी कधीच कोणाला


कारण वेदना आणि प्रेम

यांनी सोडलंच नाही मला


असू दे बाकी राहू दे बाजूला

मी काय असाच आहे वेडा

तुला आठवलं तर ये 

नाहीतर राहू दे उगाच त्रास नको तुला


मन खूप हट्टी आहे ना ऐकतच नाही

काढेल त्याचीही समजूत

फक्त एक कर तो वारा येतो ना

त्याला पाठवून दे 

तेव्हडीच सोबत होईल त्याची


आणि हो निरोप पाठव 

की प्रेम नाही म्हणून

जिवंत तर नाहीच पण तेव्हडंच

अश्रूंना मोकळीक मिळेल

अजून त्रास सहन करेल तुझ्यासाठी


कारण वेदना आणि प्रेम

यांनी सोडलंच नाही मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy