STORYMIRROR

Aditya Yadav

Comedy Drama Fantasy

3  

Aditya Yadav

Comedy Drama Fantasy

युद्धात धारातीर्थी पडलेल्या प्रेमकविता

युद्धात धारातीर्थी पडलेल्या प्रेमकविता

1 min
14.2K


मन आनंदी करण्या तुझे माझ्या शेकडो कविता मृत्युमुखी पडतात

काही जखमी होतात काहींना वीरगती आणि अखेर काही मनात तुझ्या विजयाचा झेंडा रोवतात

हल्ली तर मी घेऊनच फिरतो पाठीवर माझ्या कवितांचे बाण, कधी वेळ पडेल आणि उचलावे लागेल टिकवण्या मनात तुझ्या आनंदाचे प्राण

कधी चिरफाडावी लागते कविता, कधी मधली एखादी ओळ छानसे चार शब्द पुरेसे असतात तुझ्या आनंदासाठी बिचाऱ्या कविता हात पाय त्यागतात

शत्रू फारच बलाढ्य असतात कवितांचे

उगाचच गाळलेले केस खराब पाणीपुरी "चारचौघे"आणि आईच्या टोमण्यांची सूरीलाठ होण्याचा विचार किंवा मैत्रिणींच्यातील दरी

असे कैक शत्रू असतात प्रयत्नात दुःखाचा झेंडा घेऊन आनंदाशी लढायला कवितांना माझ्या मग लढावं लागत,

सर्वांसोबत विचारांना घालवताना मरायला किंवा मारायला

युद्धात दुखासमोर जाऊन तुला हसवायच एवढसच कारण घेऊन त्या जन्मतात, बेचिराख होतात

पण संपूर्ण प्रयन्त करून कळी सुखाची तुझ्या मनात फुलवत ठेवतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy