रात्र माझी गुणी फार
रात्र माझी गुणी फार


रात्र माझी गुणी फार ।।
विचारांवर होतो मी स्वार
वहीपेनचा घेता आधार
क्षण दोन क्षणात होते दुनिया पार
रात्र माझी गुणी फार।।
दिवसाची कोडी अवघड प्रश्न
स्वतःच अर्जुन रात्री स्वतःच कृष्ण
दिवसाच्या कृत्यांवर प्रायश्चित्ताचे वार
रात्र माझी गुणी फार।।
रात्र विचारवंतांची, चिकित्सकांची, कलाकारांची राहस्यांची, गुंडांची, प्रहारांची,
बचावांची शोषते साऱ्या थकल्यांचा भार
रात्र माझी गुणी फार।।
शांततेची सखी अंधाराची सोबती चंद्राची प्रेयसी
झोपेची जननी मृत्यूनंतरचा एकमेव आधार
रात्र माझी गुणी फार ।।