भारतीय सुशिक्षित तरुणांसाठी...
भारतीय सुशिक्षित तरुणांसाठी...


निवडणुकीत प्रचार करताना पहिल्यांदा राजकारणाच्या इतक्या जवळ आलो. ऐकुन माहिती होत थोड पण अता त्यात काम करताना एक जिज्ञासू म्हणून संपूर्ण माहिती करायची लागलेली सवय. जसा अभ्यास सुरू केला तसा घाम फुटायला लागलाय. एक सुशिक्षित तरुण असून देखील खऱ्या गोष्टी माझ्या पर्यन्त येत न्हवत्या आणि ज्या येत होत्या त्या कश्या ठरवून माझ्यापर्यंत पोहचवल्या जात होत्या हे आत्ता मला समजतंय. माझे कोणत्याही पक्षा सोबत नातेसंबंध नाहीत किव्वा विरोध नाही. कारण तेवढा माझा अजून अभ्यास नाही पण एक गोष्ट ह्या election ला पक्की झाली, कळली. की ह्या देशाचा जर खरंच विकास करायचा असेल तर सर्व प्रथम तरुणांनी राजकारणामध्ये लक्ष घालून आपली प्रतिक्रिया बनवणे गरजेचे आहे. मी माझ्या आयुष्यात खुश हा attitude सोडणे गरजेचे आहे. घडणाऱ्या घटना, व्यक्ती, गोष्टी ह्या मागील सत्य शोधण्याचा थोडा प्रयत्न करावाच लागेल. हा देश आपला आहे आणि आपणच ह्याचे भविष्य आहोत.