टोल नाका
टोल नाका
आज पुण्यावरून सातारला येत असताना अनेवडी टोलनाक्यावर बस थांबली आणि strawberry विकणारा एका मुलाकडून एक strawberry चे packet विकत घेतले. मी त्याला पैसे देणार इतक्यात गाडी चालू झाली. त्यांनी ते पॅकेट खिडकीतून माझ्याकडे टाकले. आणि जोरात ओरडला पैसे खाली टाका. मला काही कळायच्या आत गाडी पुढे आली. मी मागे बघितले तर तो माझ्याकडे पैसे गाडीतून टाका म्हणून इशारा करत होता. मी कसलाही विचार न करता पैसे टाकले. ते त्यानी पाहिलं. हसला आणि धावत येऊन पैसे घेतले.
पुढे आल्यावर मनात आला की त्यानी बिनधास्त माझ्यावरती विश्वास कसा ठेवलं आणि मी ही कोणताही विचार न करता त्याला पैसे कसे दिले. मित्रांनो विश्वासघात करणे खूपच सोप्पे आहे. पण विश्वास राखणे खूपच अवघड आहे. जर आज मी त्याला पैसे दिले नसते तर कदाचित तो इथून पुढे कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही. आणि मला काही न झाल्यामुळे मला ही सवय लागेल लोकांना गांडवयची. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा छोट्या छोट्या चांगल्या सवयीचं आपल्याला मोठं बनवतात.
