Aditya Yadav

Others

2  

Aditya Yadav

Others

साहेब टायर गेलाय !!

साहेब टायर गेलाय !!

3 mins
892



  दिवाळी झाली, गोआ झालं, मामाच गाव झालं आणि नियमाप्रमाणे सकाळी अक्षय आणि मी बुलेट वर कर्मभूमीच्या वाटेवर निघालो. सकाळी ८ ची वेळ होती वातावरण एकदम मस्त आणि रस्त्यांचा तर नादच नाही. तासभर गेला चहा झाला. गाडीवरून जाताना अचानक मागून एक माणूस टायर मधील हवा कमी झालीये असं सांगत पुढे निघून गेला. उतरून पाहिलं तर टायर पंक्चर झालं होता खेड शिवापूरच्या जवळ रास्ता दोन मोठ्या बागा आधीच सर्व प्रवास मुले कंटाळलो आणि मग टायर पाहून जरा वैतागलोच. अक्षय उतरला आणि बॅग घेऊन केविलवाण्या चेहऱ्याने मागे चालत येऊ लागला आणि मी हळू हळू पंक्चर काढणाऱ्याच्या शोधात निघालो. 

  ५चच मिनिटात एक दुकान सापडलं आणि फुल्ल थाटात भाऊ पंक्चर काढा म्हणून मी आज्ञाच केली. त्याच्या चेहऱ्यचवरची माशी पण हलली नाही. आम्ही बुलेटच पुंकतुरे काढत नाही असा म्हणत जे काम चाललेलं ते त्यांनी परत चालू केलं. आता माझी भह एकदम केविलवाणी झाली. भाऊ बघाना !! त्यांनी बघितले पण नाही तोपर्यंत अक्षय मागून चालत आलेला त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मी नकारार्थी मान हलवली. मग एक दुकान दुसरं दुकान करा १२ - १३ दुकान झाली पण बुलेटच्या मागच्या चाकाला हात लावणारा बहाद्दर काही सापडेना. शेवटी मी कोणी पंक्चर काढत का पंक्चर वगरे चाळे पण केले ( मनातल्या मनात ) माझं तरी बर होत पण अक्षय तर आता पार गाळून गेला होता. 

   शेवटी एका दुकान समोर येऊन थांबलो मी अशाच सोडली होती. आणि दुकानात पाहिलं तर दोन लहान मुले बसली होती. मी डोळ्यांनीच एका पोराला पंक्चर दाखवलं. आणि तो डोळ्यांनीच हो बोलला मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना मी पुन्हा मागच्या चाकाकडे पाहिलं तो पुन्हा हो बोलला. तो लगेलग पुढे आला. म्हणाला साहेब गाडी डबल स्टॅन्ड वर लावा. मला जरा टेन्शन आला पण दुसरा पर्याय नसल्याने मी पण लगेच उतरून गाडी डबले स्टॅन्ड वर घेतली. मोठा मुलगा लांबूनच पाहत होत्या. ह्या बेत्याने टोकदार पट्टीने रिम ला मार्किंग केलं आणि माझ्याकडे बघून चैन ची टाईमिंग हालत नाही ना असे म्हणाला. आता माझा विश्वास जरा वाढला. लगेच मला गाडी तिरकी करायला लावून तयार काढला आणि ढकलत दुकानाकडे घेऊन गेला. एवढ्याश्या पोराला तो भाला मोठ्ठा टायर खोलताना जरा पण त्रास झाला नाही. 

आणि तुवा बाहेर काढल्या काढल्या साहेब टायर गेलाय !! अशी गर्जना झाली 

   एवढा वेळ बाजूला बसलेला मोठा मुलगा लगेच पुढे आला. त्यांनी ट्यूब हात घेतली टायर चेक केला आणि मला टायर आणि तुंबे कशी बदलली पाहिजे हे पटवू लागला. आम्ही पण लोकांना पटवण्याच्याच विभागामध्ये काम करत असल्याने मला जरा गम्मत वाटली. मग बोलता बोलता दोघं भाऊ आहेत त्यांच्यी २ दुकाने आहेत एक पालिकांच्या बाजूला वडील चालवतात आणि हे हि दोघे सांभाळतात. सध्या रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये धंदा जोमानं चाललंय असं सांगितलं शिक्षण वगरे चालू आहे हे हि सांगितलं. मी अक्षयची वाट बघत होतो. तो पण पोचला आम्ही पुण्याला जाऊन टायर बदलू आटा तात्पुरता काहीतरी सोय करू असं ठरवून त्यांना बोललो कि तात्पुरता दे काहीतरी करून. पण दोघे इतकी हुशारीनं आणि मन लावून मला पटवून देत होती मी इथंच का टायर बदलला पाहिजे त्याचे फायदे काय काय आहेत तोटे काय काय आहेत. शेवटी मी फक्त त्या दोघांकडे बघून तिथे टायर आणि तुट्यूब बदलून घेतली. त्यांचा नंबर घेतला एक फोटो काढला. त्यांनी ना सांगताच ब्रेक सेटिंग चेक केलं. चैन ला ब्रेक ला ऑइलिंग केलं. तूम्ही नक्की मोठे होणार अस त्यांना सांगायला न विसरता आम्ही आमचा थोडासाच राहिलेला प्रवास पुन्हा सुरु केला. 

आज बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामध्ये स्किल वाल्या लोकांना काहीच अडचण राहणार नाही हि शिकवण त्या दोन छोट्या मित्रांकडून मिळाली . 


Rate this content
Log in