Sangita Tathod

Romance

3  

Sangita Tathod

Romance

यशस्वी धाडस

यशस्वी धाडस

3 mins
180


 बी .ई .फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यावर पाहिले सहा महिने भुर्रकन उडाले .संकेतचे फर्स्ट सेमिस्टर जवळ आले होते.प्रॅक्टिकल एक्साम दोन दिवसांवर येऊन ठेपली .प्रॅक्टिकल सबमिट करायचे होते .त्यासाठी लागणारे साहित्य आणायला तो दुकानात जातो .बाहेर येतो तर,त्याच्या बाईक जवळ एक तरुणी उभी असते .

 "रात्रीचे आठ वाजले .प्लीज मला तुम्ही एल.

जी .कॉलेजला सोडता का ?"तरुणी

संकेतने बाईक सुरु केली.ती मागे बसली ,पण अंतर राखूनच .कॉलेज आले.बाईक गर्ल्स होस्टेल जवळ थांबली .ती उतरली .

"थँक्स " एवढे बोलुन ,स्ट्रीट लाईट च्या अंधुक 

प्रकाशात ती गडप झाली .संकेत याच कॉलेज मध्ये 

शिकत होता .अरे ! ही तर आपल्याच कॉलेजची

आहे ! कोण असेल ? मनात विचार घोळत होते.

    फर्स्ट सेमिस्टर संपत आले होते .अभ्यासाच्या टेन्शन मध्येही संकेतचे मन तिचे हसरे डोळे आणि ""थँक्स "असा मधूर आवाज शोधत होते .

    शेवटचा पेपर संपवून संकेत एकटाच

होस्टेल वर येत होता ..मधेच रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मुलीने आवाज दिला .बघता क्षणी

त्याने ते डोळे ओळखले .


जिसे ढुंड रहा था मै इधर ,उधर

वही तो मिला रही आज मुझसे नजर


"त्या दिवशी थोडी, गडबडीत होती ,म्हणुन तुमचे 

आभार मानू शकली नाही ."ती

   जो मधुर आवाज ऐकण्यासाठी संकेतचे कान आसुसले होते त्या आवाजातील शब्द अन शब्दअलगत त्याच्या मनात साठत होते .

तिच पुढे म्हणाली ,"थँक्स, बाय द वे, मी सानिया.

फर्स्ट इयर .केमिकल फॅकल्टी .तुम्ही ?

 " मी ,संकेत .मेकॅनिक फॅकल्टी ,फर्स्ट इयर .

 तू मला ओळखत होतीस ?"संकेत

" हो , एकदमच अनोळखी मुलाच्या बाईक वर कशी

बसणार ?"सानिया

संकेतची तर मती गुंग झाली .तो म्हणाला ," तू मला

कसे काय ओळखत होतीस ?".

"ऍडमिशन च्या वेळी तुम्ही मला मदत नव्हती केली

का ?"सानिया

 " तू आधी मला तुम्ही वगैरे बोलणे बंद कर ."संकेत

    बस - - - या पहिल्या भेटीनंतर आणखी भेटी

झाल्या .मोबाईल नंबर्स ची देवाण घेवाण झाली .

गुड मॉर्निंग ,गुड नाईटचे मेसेज सुरु झाले .आवडी

निवडी कळल्या .मॉल मध्ये दोघांची मिळून

शॉपिंग झाली .एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोन

जीवांनी जे करायला हवे ते सर्व संकेत आणि

सानियाने केले .चोरी चोरी ,चुपके चुपके सुरू

असलेलं प्रेम , मित्र मैत्रिणी पासुन कसं लपेल ?

दोघांच्या नावावरून चिडवणे सुरू झाले .

    फायनल इयर आले .एके दिवशी मावळत्या सूर्याला, किलबिलणाऱ्या पाखरांना ,हिरव्यागार वृक्षवेलींना साक्षीला ठेऊन,दोघांनी एकमेकांना वचन दिले .'आयुष्यभर सोबत राहण्याचे ' पण - -

उगवत्या सूर्याला सानिया घरी निघुन गेली .जातांना

तिने संकेतला मसेज केला ,"पप्पांची तब्बेत अचानक

सिरीयस झाल्याने घरी जात आहे ." 

  दोन दिवसांनी संकेतने ,सानियला कॉल केला .

आयुष्यात कधी बसला नसेल असा धक्का त्याला

बसला .सानियाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता .

कॉल करून काही उपयोग नाही ,हे माहिती असुनही

,संकेत वेड्यासारखा कॉल्स करतच राहिला .

खुप वेळाने त्याने स्वतःला सावरले .

  जुईकडे चौकशी केल्यावर कळले की - -

सानियाचा चुलत भाऊ त्याच कॉलेज मध्ये शिकत

होता त्याने सानियाच्या पप्पांना ,संकेत आणि सानिया

बद्द्ल सर्व काही सांगितले .त्यांनी खोटे बोलुन तिला घरी बोलावून घेतले आणि तिचे शिक्षण कायमचे बंद केले .

  आता काय करावं? विचार करून करून संकेतचे

डोके बधिर झाले .शेवटी घरी जाऊन मम्मी ,पप्पांना सर्व सांगायचं ठरवितो .त्याच रात्रीची ट्रेन पकडून तो नागपूरला आला .असा अचानक संकेत घरी आलेला बघुन मम्मी पप्पा चक्रावले .पण - -आल्याआल्या कसे विचारणार ? पप्पांनी ऑफिसची तयारी केली .

संकेतनी पप्पांचा हात हाती घेतला."पप्पा नका

ना जाऊ ?"संकेत

  थोडा फ्रेश झाल्यावर तो मम्मी ,पप्पांना

सर्व सांगतो .तब्बल चार दिवसांनी तो शांत झोपतो.

   दुसऱ्या दिवशी सकाळीच सहा वाजता संकेतच्या

गेटवर जोराचे आवाज ऐकून तिघेही बाहेर येतात .

तर गेटवर सानिया !घाबरलेल्या अवस्थेत !तिला

आत घेतात.घरात आल्याबरोबर ती संकेतच्या

पप्पाचे पाय धरते आणि म्हणते ,"चाचा ,प्लीज

आमचे लग्न लावून द्या. माझ्या अप्पीच्या मदतीने

मी घरातुन पळून आली.संकेत नागपूरला आला,

कळले .त्याच्या मित्राकडून तुमचा पत्ता घेतला आणि

नागपूरला आले.चाचा मला खरच कल्पना नव्हती की आमच्या दोघांचे धर्म वेगळे आहेत. त्यामुळे आम्ही सोबत राहू शकणार नाही ."सानियाने धाडस बघुन सर्वाना तिचे कौतुक वाटते.

    प्रेमासाठी स्वतःचा परिघ छेदून बाहेर पडणाऱ्या,

पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिम्मत करण्याऱ्या

सानियाचा खरच अभिमान वाटतो .

   संकेतचे वडील दोघांना समजावतात .आधी

शिक्षण पूर्ण करायला सांगतात. त्यांचा साखरपुडा

करतात.ते सानियाला म्हणतात, "सानिया ,आता

तू माझी होणारी सुन आहेस .कशालाही घाबरायचे

नाही .तुझे अब्बू तुझ्या केसालाही धक्का लावणार

नाहीत याचा बंदोबस्त मी केला आहे ."

  संकेतचे वडील सानियाचे शिक्षण पूर्ण करतात.

दोघांच्या लव्ह स्टोरी ची चर्चा संपूर्ण कॉलेज मध्ये

रंगते .संकेतला  कॅम्पस सिलेक्शन मध्ये चांगला

जॉब मिळतो .संकेतचे पप्पा त्या दोघांचे

 धुमधडाक्यात लग्न लावुन देतात ,आणि ते दोघे

सुखाने संसार करतात.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance