STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

2  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

व्यक्ती वर्णन - गीता गोपीनाथ

व्यक्ती वर्णन - गीता गोपीनाथ

1 min
132

      भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या IMF (International Monetary Fund) मुख्य अर्थतज्ञ आहेत.

      गीता गोपीनाथ यांचा जन्म 8 डिसेंबर 1971 सली कोलकत्ता येथील म्हैसूर या शहरात झाला. त्या जन्माने भारतीय आहेत. गीता यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए आणि दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधून एमएची पदवी मिळवली आहे. नंतर त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली.

     49 वर्षीय गीता गोपीनाथ या हॉर्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र हा विषय शिकवतात. त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ पदाची जबाबदारी लाभलेल्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहे. जगातील एक चाणाक्ष आणि अनुभवी अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.

      गीता गोपीनाथ यांनी यापूर्वी केरळ सरकारचे आर्थिक सल्लागार म्हणूनही कामकाज पाहिलं आहे. त्यांचे संशोधन अनेक अर्थशास्त्र जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.

     गीता गोपीनाथ यांचा समावेश न्यूयॉर्कच्या कार्नेगी कार्पोरेशन ने '2021 ग्रेट इमिग्रंट्स' च्या यादीत केला आहे. 2019 मध्ये भारत सरकारने त्यांना 'प्रवासी भारतीय' सन्मान दिला, जो परदेशी भारतीय आणि भारतीय डायस्पोरा यांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.

     गीता या असामान्य बुद्धीच्या अर्थतज्ज्ञ असून त्यांना पुरेसा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. तसेच, त्यांच्यात उत्तम नेतृत्वगुणही आहेत, अशा शब्दांत नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टाइन लेगार्ड यांनी गीता यांची प्रशंसा केली होती.

     एक भारतीय महिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावते. ही भारताच्या सर्व स्त्रीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यांच्या विषयी छोटीशी माहिती आपणापुढे सादर करताना मला खूप आनंद होत आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational