Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Meenakshi Kilawat

Inspirational


4.4  

Meenakshi Kilawat

Inspirational


वटवृक्ष

वटवृक्ष

4 mins 1.6K 4 mins 1.6K

*वटवृक्षाची पूजा करणे वटवृक्षाचा सम्मान करणे आहे*

निसर्गाची रक्षा करणे हे वटवृक्षाचे अतुलनीय कार्य आहे.


आपण वटवृक्षाची जपनुक केली पाहिजे।आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्या पूर्वाजानी वटवृक्षाला खूब महत्व दिले होते.वटवृक्षावर कित्येक लेखक कवि यांनी सढळ हाताने लेखण करून कथा,दंतकथा,कवितेत मुक्त कंठाने वटवृक्षाचे भरभरून वर्णन केलेले आहे. आजच्या काळातील अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतांना दिसतात.त्या मागेही इतिहास दडलेला आहे.अापल्या पूर्वजांनी जे समाजात संस्कारीत बी रूजविले आहेत.ती अतिशय महत्वपूर्ण आणि सामाजहिताला जपण्यासाठी फार उपयुक्त संदेश देवून मोलाचे कार्य केलेले आहे.

वटवृक्षाची पूजा करणे काही अंधश्रद्धा नाही. तो फार मोठा समजूतदारपणा आहे.प्रत्येकाला आपल्या पर्यावरणाची जाणिव असायला पाहिजे.आपल्या पूर्वजांनी वटवृक्षावर सखोल अभ्यास केलेला होता. भारतीय स्त्रियां वटवृक्षाची पूजा मोठ्या भक्तिभावानी करतात .त्यामागे काही कारणे आहेत.वटवृक्षाच्या मेहरबानी ने आज परिसरात प्राणवायु मोफत मिळत असते.अश्या प्राणवायु मिळणाऱ्या वटवृक्षाची पूजा केलीच पाहिजे.कित्येक वर्षा आधी वटवृक्षाची प्रचिती सत्यवान सावित्रीला आली होती.सावित्रीचा पति सत्यवानाला सर्पदंश झाला होता. सत्यवानाचे श्वास घेणे बंद झाले होते.तेव्हा वटवृक्षानेच प्राणवायु दिला असावा असा समज आपण काही वेळ करू शकतोय. त्याच वटवृक्षा खाली सावित्रीचा प्राणप्रिय पती सत्यवान जीवंत झाला होता.यमाची गोष्ट कितपत खरी वा खोटी आहे.हे आज सांगू शकत नाही.परंतु सावित्रीची भक्ती प्रेम पाहुल कदाचित वटवृक्षाला सावित्रीची दया आली असावी. आणि प्राणवायु देवून वटवृक्षाने सत्यवानाला जीवंत केले असावे.अश्या गुणकारी वटवृक्षाचा सन्मान करने योग्यच आहे.असे माझे मत आहे.वटवृक्ष संजीवनी पेक्षा कमी नाही.हा वटवृक्ष मानव कल्याणा करीता सदैव तैयार असतो.उदार वटवृक्ष ईश्वरा पेक्षा कमी नाही.म्हणुन वटवृक्षाची रोजच पूजा करायला हवी.आणि वटवृक्षाचे कार्य पाहुण त्याची महत्ता कीती महान आहे.याची प्रचिती सावित्रीला आली होती.म्हणुनच वर्षोंनुवर्ष त्याची कीर्ति अबाधित आहे.यावरून वटवृक्षाची महत्ता कायम टिकवून ठेवली पाहिजे. तसेच काही भारतीय स्त्रियां वटवृक्षाची पूजा मोठ्या भक्ति भवाने करतांना दीसतात.वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान असल्याचे शास्त्रातही सांगितले आहे.त्या प्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा जमिनित रूजून मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारात सौभाग्यदायी पावित्र्याचे प्रतीक मानतात.

    आपला भारत देशाची लोकसंख्या पहाता लक्षात येते की कित्येक लोकांना रहायला घरे नसतात.ती लोक वटवृक्षाच्या शीतल छायेत आपला निवारा बनावतात.पशु पक्षी ही वटवृक्षाला शरण येतात .सूर्याची किरणे सुद्धा वटवृक्षाला भेदून आत येत नाहीत.वटवृक्ष ज्ञानी,अज्ञानी, सर्व स्थराच्या लोकांना शरण देतो.वटवृक्षाखाली संत,महात्मा,योगी तपश्चर्या करताना दिसतात. काही लोक वटवृक्षाशी संवादही करतांना दिसतात.काही लोके अापले पुर्ण जीवन वटवृक्षाखाली राहून काढतात.

   भारतीय संस्कृतित पतिव्रता धर्म निभावण्यात स्त्रियां जगात सर्वात पुढे आहेत.ती जर वटवृक्षाची पूजा करूंन प्रार्थना करत असेल तर ती महान व्यक्तित्वाची धनी आहे.तसेच भारतीय स्त्री ही दया,माया,ममत्वाची साक्षात मूर्ति आहे.ती आपल्या हृदयात करुणा भरून जगत असते.जरी तिला काही मिळत नसेल तरी ती आपल्या पतिसाठी आपल्या मुलांसाठी ईश्वरा जवळ प्रार्थना करीत असते.भारतीय स्त्रियांच्या भावना कोणीही बदलवू शकत नाही.तिच्या नजरेने बघाल तर ती प्रेमा साठी काहीही करू शकते ती मुऴातच करूनेचा सागर,

ह्रदयात घेवून जगत असते.ज्या वटवृक्षाने सत्यवानाला प्राण दिले होते.अश्या वटवृक्षाला काही महिला भर उन्हाऴ्यात सात दिवस पाणी देतात.त्याला आपला भाऊ मानतात.भोळी भाबड़ी श्रद्धा ठेवून या अर्वाचीन वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना का करतात.आणि त्याची भक्ति वटवृक्ष हमखास पूर्ण करतोही.

   तसेच काही लोके वटवृक्षाची पूजा करताना महिलांची खिल्ली उड़वतांना दिसतात. त्यांच्यावर हसतात.हे कितपत योग्य आहे.आपल्या पूर्वजांनी जे मार्ग दाखवलेले होते ते शंभर टक्के बावन्नकशी खरे होते.त्यावर अमल करने म्हणजे आपले जीवन सुखमय व्यतीत करणे आहे. सर्व मंगल करणारी संस्कार आपल्या भल्यासाठीच होती.आपनही काही वेळ जर वटवृक्षाखाली शांतपणे बसून आपल्या तक्रारी सांगितल्यास वटवृक्ष ऐकतो.मनातील घुसमट काढून स्वता:ला तरोताजा करू शकता.असा तो भव्यदिव्य देखणा वृक्ष कितीही कौतूक केले तरी कमीच आहेत.याचे वैशिष्टपूर्ण अनेक गुणधर्म आहेत.वटवृक्षात बाष्पाचे प्रमाण जास्त असल्या मुळे इतर वृक्षांपेक्षा अधिक शीतलता व थंडावा देत असतो. यात अनेक औषधी गुणधर्म असून त्याचे विविध फायदे आहेत.वडाच्या चिकाने पाय मऊशार होतात व भेगा भरतात. पारंब्याचाही उपयोग मळमळ, उलटीसाठी होतो. उंदिर तसेच विंचवाच्या दंशावर वडाचा चिक उत्तम औषध आहे. वडाची पाने सूजन व ठणक असल्यास गरम करून तेल लावून बांधल्याने लगेच आराम पडतो. वडाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोणासाठी उपयोग करतात. अशा प्रकारे वडाची साल, पाने, पारंब्यामुळे यांच्या औषधी गुणधर्मामुळे हा वृक्ष मानवाचा सखा मित्र समजला जातो. प्रत्येक गावात जागोजागी हा विशाल वटवृक्ष धीरगंभीर मायेची सावली देणारा सुशांत, शालीन डेरेदार सुंदर वटवृक्षाची पुजा केल्यास वावग काय ?असा थोर महिमा समजल्यावर त्याची पूजा स्त्रिया मोठ्या श्रद्धेने करतील हीच सार्थ अपेक्षा करतेय.

     पण काही ठिकाणी शहरात जेथे अाता वटवृक्ष दिसत नाहीत, तेथे आजकाल वडाच्या फांद्या विकत मिळतात व त्याची पूजा शहरातील आध‍ुनिक महिला करतात. तेव्हा पर्यावरणाला धोका निर्माण होत असतो.

विनाकारण वटवृक्षाला किंवा इतर वृक्षाना तोडू नये किंवा छाटू नये.कोणी जर वृक्ष लावत नसेल तरी चालेल पण वृक्षाना तोडून इजा पोहोचवू नये. वृक्षांची पुजा महिला निच का पुरुषांनी ही करावी .व पर्यावरणाला हातभार लावावा.यालाच खरी पूजा समजून वृक्षांची सेवा करावी. 

    तसेच भारतीय संस्कृती मधे वृक्षांची पूजा करण्याची 

परंपरा रूढ आहे.ती परंपरा टिकावून वटवृक्षाची निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांशी आपली नाती टिकविली पाहिजे.आणि विविध व्रत उत्सवात, सणासूदित विविधांगी पाने सुरेख फुले ईश्वर चरणी वहावे.किवा हार तुर्रे, गजरे करून स्वागत समारोहाची शान वाढवावी.वृक्षपूजन केल्याचे पुण्य लाभेल.ही परंपरा पुर्वापार चालत आलेली आहे.मानवाला उपयोगी ही वनराई नसांगता खुप अमर्याद सतत देतच असतेय. तिचे काहीतरी सेवा करून प्रत्येकाने ऋण फेडायचा प्रयत्न केला पाहिजे.   


Rate this content
Log in

More marathi story from Meenakshi Kilawat

Similar marathi story from Inspirational