Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Meenakshi Kilawat

Inspirational


4.5  

Meenakshi Kilawat

Inspirational


वसंत ऋतू

वसंत ऋतू

4 mins 3.1K 4 mins 3.1K

लेख... "अद्भुत वसंतऋतू आनंदाची अनुभूती "

या निसर्गाच्या किमया बघा मनुष्य,पशु,पक्षी मोठ्या आशेने वंसतऋतुची सारखी वाट बघत असतात.. आणि हे ऋतुचक्र सारख फिरत असतय. ऋतुचे अनेक रंग प्रकृतित दडलेले आहेत.त्यात हा अमुल्य अद्वितीय असा

"ऋतूराज वसंत" वाखाणन्याजोगा व जीवन भरणारा आहे.या ऋतूमध्ये निसर्गाने सृष्टीवर असंख्य रंगाची उधळण केलेली असते.वसंत ऋतूत असंख्य रंगाने धरती नटलेली असते त्या विविध रंगाच्या छायेत मनुष्यच नाही तर प्रत्येक जीव सुखावत असतो. तृप्त होत असतो.

वर्षभरातील बदलत्या ऋतुचक्राची अनेक कार्य आहेत. ती सर्व आपआपली कार्य चोखपणे करित असतात. मराठी नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होत असते म्हणजेच थोडक्यात चैत्र महिण्यापासून ऋतुचक्राची नोंद घ्याविशी वाटते. केवळ बदलत्या निसर्गाचे वर्णनच नाही तर या बदलत्या ऋतुचक्राचे मानवी मनावर उमटणारे भावतरंगही आश्चर्य करण्यासारखे असतात.म्हणजे हा निसर्ग मानवी सृष्टीला प्रफुल्लित,उत्कर्षित करत असतो.शिवाय मनाला आनंदाची पर्वणीच वेळोवेळी मिळत असते. सर्वात महत्वपूर्ण ऋतू म्हणजे ऋतूराज वसंत सर्व सृष्टीत चैतन्य पसरवणारे व मनाला भुरळ घालनाऱ्या या ऋतुचक्राचे जितके कौतूक केले तितके कमीच अाहे.

कोकिळेचे मंजूळ स्वर मनाला कसे आल्हादित करीत असतात.गुलाबी शितल वाऱ्यासवे कोकिळ,मैनेचे ही दर्शन होवूनी मंजूळ नाद कानावर पडला की समजावे ऋतूराज वसंत अालाय . तो आपल्या अलगद पाऊलाने येतो आणि सर्व जनामनाला आपल्या वलयात नेमके गुरफटतोय ,शिशिर ऋतूत पानगळती होवून नवपालवी फुटायला सुरवात होत असते.ती वृक्षांची कोमल पालवी नवीन उल्हास घेवूनच येत असतेय. व प्रत्येकांच्या मनोमनी उत्साह भरत असतो. सर्वत्र झाडाखाली पाला पाचोळ्याचा सडा पडतोय.आणि शिशिर संपताच चाहूल लागते ती ऋतूराज वसंताची. त्यास चैत्रपालवी पण म्हणतात. त्यावेळी आपल्या भारतिय मराठी संस्कृती प्रमाने भरपूर सण उत्सवाची नांदी असते. नवविवाहिता, नवयौवना अगदी अतूलनिय आंनदाने सोहळ्यांमध्ये भाग घेत असतात. वसंत ऋतूच्या प्रत्येक सोहळा नाविन्यपूर्ण आल्हाददायक असतोय. प्रत्येक वस्तू मोहक वाटते. आबाल वृद्ध ही सतेज दिसतात. म्हणुनच वसंतऋतूला ऋतूराज म्हणून संबोधण्यात येत असते.. कारण सहा ऋतूंच्या सोहळ्यांमध्ये वसंत ऋतूचा सोहळा काही औरच मजा देत असतोय. वसंतऋतूची चाहूल लागताच सारी सृष्टी आनंद अनुभवत असते. जणू प्रत्येक वृक्ष आपल्या बालकांना प्रसवत असते.आणि प्रत्येक डहाळीरूपी अंगाखांद्यावर मस्त आपल्या बालकांना खेळवत झोके घेत असते .कोकीळ मधुर कुंजन करत असते.त्यात वाऱ्याचा शितल झोका छान लपंडाव खेळत असतो. गुडीपाडवा, वसंतपंचमी, चैत्रगौरी सप्तमीला,चैत्रनवरात्र प्रत्येक सणाला आंम्रवूक्षाचा मोहोर वाहून मोठ्या उल्हासाने पुजन करतात.व छोट्या कैऱ्याची चटनी किंवा पन्ह्याचा आंबट गोड सुधारस हमखास असतोच.

होळी उत्सवानंतर वातावरणात एक प्रकारची उष्णता जाणवू लागते. आणि अशावेळी मंदमंद वाऱ्याची कोवळी झुळुक चाहूल घेऊन येत असते.ती प्रेमळ झुळूक तनामनास हर्षित करून आल्हाद देवून जात असते. होळीची रंगपंचमी वसंत उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करतात. रंगपंचमीला रंगाची बरसात होते. त्यासाठी पुर्वी अनेक प्रकारे तयारी करून लाल,केशरी पलाशफूले वनातून आणून ती भिजवून त्यापासून आयुर्वेदानुसार औषधीयुक्त बणविलेले रंगानेच रंग खेळत असे. आणि आमचे आमात्य आम्हास वेळोवेळी वृक्षसंवर्धण करण्यास सांगत असे ,व कोणत्या वृक्षाचा कसा फायदा होतो हे ही सांगुन नवनविन वृक्ष कसे तयार करायचे.हे ही जातिने सांगत होते.निसर्गाने खुप मोठी कृपा मानवजातीवर केलेली आहे.आरोग्यवर्धक हरितगामी वायुवलय निर्माण करून आपणास निसर्गाने विशेष देणगी दिलेली आहे.कितीतरी वृक्ष औषधी गुण घेवूनच जन्मले आहेत.आणि माणवाच्या निर्माण कार्याला सबळ हातभार लावला आहे. कडूनिंब,आम्रवृक्ष मंदार, अशोका, ख्रिसमस , ताडवृक्ष, गुलमोहोर फणस,काजू, देवदार इत्यादी वृक्ष माणवाचे कवच बनलेले आहे.जमिनिवरती कलिंगड,खरबूज निरनिराळ्या लतावेली कश्या सरपटून सारे रान बहूरंगी करून वेल्हाळतांना दिसतात.

तसेच पानाफुलांनी बहरलेले हे निसर्गिय वैभव महाविस्तीर्न रूपदर्शन मोहित करून डोळ्यात भरते. आणि हे वृक्ष,ओव्हळ ,सरीता सागर पाहून मनोमनी मोर नाचायला लागतात.निरनिराळे रंगीबेंरगी पक्षी व त्यांचा मधुर कंठ पक्ष्यांची मधूर किलबिल नकळत मनुष्याला गुणगुणायला लावत असतात. नवल व आश्चर्याने मनास कसे मोहवून टाकत असते. निसर्गाने रेखाटलेली ही अद्वितिय जींवतता न्याहाळून अलगद टिपावी व ही निसर्गाची आलौकिक रचनात्मकता एकाग्र होऊन रममान व्हावया हा वसंत उपयुक्त आहे.

हिरवी, गुलाबी ,केशरी,आकाशी रंगाच्या फुलांचे ताटवे पृथ्विच्या सौदंर्यात भर घालत असतात .जीकडेतिकडे फुलांनी भरगच्च सजलेले ताटवे पाहून मन प्रसन्न व्हायचे, पण हल्ली तसे वातावरण दिसत नाही. आजच्या पिढीचे सौदंर्य म्हणजे मोठमोठी गगनचुंबी इमारती ,व सिमेंट क्रॉक्रीटच्या सडका व त्यावरील यातायात असून,नकली रंग,नकली मेकअप,टूव्हिलर,फोरव्हिलर इत्यादीचे प्रदूषणच दिसते आहे. अश्या रमनिय दिव्य ऋतूराज वसंताचे वर्णन संत कलीदासाने शाकुंतलंमध्ये केलेल आहे.संत तुलसीदासाने रामायण ग्रंथात केलेले आहे. अनेक लेखक ,कविंनी युगानुयूग वसंतऋतूचे भरभरून कोड कौतूक केलेले आहे. वसंतऋतूचे अद्भूत विलोभनिय वर्णन करावयास शब्द ही अपुरे पडते आहे. ही "अद्भुत वसंतऋतू आनंदाची अनुभूती "कृतार्थतेच्या पलीकडे आहे.

"वंसत येतोय घेवून रंगधारा

फुटती मनात प्रकाश धारा

नवसंजीवन देती नवआशा

उमले उल्हासाचा नव घुमारा"..

अनेक संत,लेखक ,कवी यांनी आपल्या साहित्यातून वसंतऋतूवर रसपुर्ण लेखणीला सलाखून धार दिली आहे. सर्वांनाच हवाहवासा वाटणारा वसंतऋतू भावविभोर करतोय. आहे..व करतच राहाणार आहे...


Rate this content
Log in

More marathi story from Meenakshi Kilawat

Similar marathi story from Inspirational