विवेकाचं वेचनं....
विवेकाचं वेचनं....
तेजोमय तारा स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी जीवन जाणून घेणे आपल्या ज्ञानात आणि आयुष्याच्या वाटचालीत उपयुक्त ठरणारे आहे .कर्तुत्वाने झेप घेण्याची ऊर्जा मानवजातीत येण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे .आहे स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे आहे त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 चाली पश्चिम बंगाल येथे झाला व मृत्यू चार जुलै 1902 साली झाला चला तर मग या महान विभुतीविषयी जाणून घेऊया. साहित्य तत्वज्ञान व राष्ट्रीय विचार विचार दूरवर पोहोचवणारे व ज्यांच्या विचारांनी आपल्या मनात ऊर्जा निर्माण होते असे युवकांचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक व ज्यांनी जीवन कसे जगावे हे त्यांच्या विचारांच्या माध्यमातून समजावून सांगितले असे युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे स्वामी विवेकानंद होय.ज्यांनी आपल्या अनमोल विचारांनी जगाला प्रभावित केले. त्यांचे विचार आजही आपल्याला आधार देतात आपल्या देशात खूप सारे महापुरुष होऊन गेले ज्यांचे जीवन आणि विचार यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते तसेच स्वामी विवेकानंद आहेत जीवनाला कंटाळून निराश झालेला व्यक्ती नव्याने उभा राहतो जेव्हा स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करून जगण्यासाठी नवीन ध्येय निश्चित करतो. आयुष्यात पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे आहे हे आपले परम कर्तव्य आहे अशा अनेक प्रकारचे तत्त्वचिंतन नरेंद्राच्या अर्थात स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून असून आपल्याला शिकायला मिळते . काही गोष्टींचे विवेचन पुढील संदर्भामध्ये पाहूया. (1)उठा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे लक्ष मिळत नाही( 2)स्वतःचा विचार स्वतः करत रहा तरच प्रगती होईल(3) गती आणि वाढ हे जिवंतपणाचे लक्षण आहे (4) या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहे परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवून जगात अंधार आहे म्हणून रडत बसतो (5) सरळमार्गी चालणे हे मनुष्याला दुर्बल बनवते(6)कोणाचीही निंदा करू नका जर तुम्हाला मदतीचा हात पुढे पुढे करायचा असेल तर नक्की करा नसेल तर हात जोडून विनम्र भावनेने विनम्र भावनेने सदिच्छा द्या (7) दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला अन्यथा तुम्ही जगातील उत्कृष्ट संवाद हरवून बसाल( 8)जोखीम घ्यायला शिका नेतृत्व करायला शिका हरलात तर मार्गदर्शन कराल करा(9) जग मोठी शाळा आहे जिथे आपण स्वतःला मजबूत बनवतो (10) आपल्याला कोणी मदत करतात त्यांना कधीही विसरू नका जे लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका जे आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका 11)स्वतःला कमी लेखू नका (12) तुम्हाला दुर्बल बनवणाऱ्या गोष्टी विषासमान असतात मेंदू आणि हृदय या दोघात संघर्ष सुरू असेल तर हृदयाचे ऐका(13) एकावेळी एकच गोष्ट करा यावर आपले लक्ष पूर्णपणे केंद्रीत करू शकाल( 14) मनात कोणत्याही गोष्टींची भीती बाळगू नका तरच तुम्ही अद्भुत असे काम तडीस नेऊ शकाल(15) तुमचा निर्भीडपणा तुम्हाला यश व आनंद मिळवून देईल( 16) मनाची शक्ती सूर्याच्या किरणांप्रमाणे आहे ती एका बिंदूवर केंद्रित होते तेव्हा प्रखरतेने चमकते( 17) आपले व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर आपल्या सुंदर दिसण्याला काहीच अर्थ उरत नाही सुंदर दिसले आणि सुंदर असणे यामध्ये फरक आहे याला ओळखता आला तो चमकल्या शिवाय राहणार नाही अशाप्रकारे विवेकानंदांनी आपले लक्ष कसे गाठावे याचे विवेचन केले.
काय शक्य आहे हे पहायचं असेल तर काय अशक्य अशी गोष्ट करून पहावी लागेल हे विवेकानंदांचे शब्द आहेत विवेकानंद म्हणतात(1) स्वतःला घडवण्यासाठी वेळ व्यतीत केला तर इतरांच्या उनिवा दिसणार नाहीत( 2) शून्यातून वि
श्व निर्माण करण्यासाठी साठीची जिद्द ज्याच्या अंगी येईल तो खरा कर्तृत्ववान होय मला जमणार नाही !मी करू शकणार नाही !असे अगोदरच म्हणालात तर तुम्ही आपले ध्येय गाठू शकणार नाही(. 3)तुमच्या आत शक्ती अनंत आहे ती ओळखून कामाला लागा( 4) अशक्य असे या जगात काहीही नाही(.5)सारे जग जरी तुमच्या विरुद्ध उभे राहिले तरीही तुमच्या ध्येयनिश्चिती पासून ढळू नका पुढे जाण्याची धमक असेल तर लोक मागे सरतील(6) संघटित होऊन केलेली कार्य निश्चितच तडीस जातात (.7) समता स्वातंत्र्य जिज्ञासा उद्योग हे गुण आत्मसात करायला हवेत (8)आस्तिका आपेक्षा नास्तिक बरे असतात कारण त्यांच्याकडे स्वताचा तर्क व स्वतंत्र असते.परंतु आस्तिकाला तुम्ही आस्तिक का हात या प्रश्नाचे उत्तर नीट समाधानकारक देता येत नाही(.9) कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही आपण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो नक्कीच यश प्राप्त होईल(10) मार्ग जितका कठीण संघर्ष तितकाच अवघड त्यामुळेच तुमचे यश श्रेष्ठ होईल (11) ठेच लागल्याशिवाय अनुभव प्रगल्भ होणार नाहीत(12) शक्यतेची परिसीमा ओळखण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अशक्यतेच्या पलीकडे डोकावून पाहणे होय (13) नव्या विचारांना जन्म द्या( 14)जगातील सारे शौर्य तुमच्या अंतरंगात दडलेले आहे अशक्य असे काहीही नाही फक्त फक्त आंतरमन जागृत करायला हवे( 15)संकटाना घाबरू नका तुम्ही घाबरले नाहीत खूप काही करू शकाल परंतु घाबरला तर मात्र काहीही नाही(16) स्वतःमधील कमकुवतपणा दुर्लक्षित करून स्वतःवर अमाप प्रेम करायचे दुसऱ्यांच्या छोट्याशा ऊनिवाही सहन करीत नाही हे अयोग्य आहे(17) ज्या व्यक्तीकडे शिकण्यासारखे काहीच नाही तो मनुष्य मेल्यात जमा आहे आणि ही त्यांची सर्वात मोठी हार आहे( 18)तुम्ही जीवनात कल्पनांना लागू केले तर नक्कीच यश प्राप्त होईल अशा प्रकारे अध्यात्मिक कल्पनांनी स्वामी विवेकानंद यांनी लोकांना प्रेरित केले या महान मानवाने उच्च विचार अध्यात्मिक ज्ञान यामुळे प्रत्येक माणसावर प्रभाव पाडला आहे.
सत्यासाठी सर्व गोष्टीचा त्याग करावा कोणत्याही परीस्थितीत सत्याचा त्याग करू नये हे सांगताना विवेकानंद म्हणतात संपूर्ण शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे होय ज्ञानप्राप्तीची मूलभूत आणि महत्त्वपूर्ण मांडणी मूलभूत तत्व ची मांडणी स्वामी विवेकानंद यांनी केली ज्ञानसाधना चे स्त्रोत्र म्हणजे ग्रंथ होय ग्रंथ ज्ञानाचा स्त्रोत म्हणजे एकाग्रता होय एकाग्रतेसाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे असे प्रतिपादन विवेकानंदांनी केले आपल्या आचार विचारांच्या बाबतीत सदासर्वकाळ सर्व प्रकारच्या अवस्थेत सत्य व पवित्र टिकवणे म्हणजेच ब्रह्मचर्य होय त्याचा विकासाचे मूळ श्रद्धा आहे युद्ध करताना विवेकानंदांनी आपल्या जीवनाचे ध्येय पुढील शब्दात स्पष्ट केले मनुष्याचा विकास सत्य धर्मा आहे मनुष्याचे शील आणि चारित्र्य महत्त्वाचे आहेत त्याची प्रवृत्ती आणि संस्कार चारित्र्य निर्मितीसाठी आवश्यक आहेत संस्कार राम धुन मानवी जीवनाचे कल्याण साधण्याचे बळ प्रबळ असते असे विवेचन करताना विवेकानंदांनी मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्यासाठी पुढील गोष्टींचे उल्लेख केलेले आहेत चारित्र्यवान व असंच सत्यवादी असल्याशिवाय व गुरुला खऱ्या शास्त्राचे मर्म अवगत असणेही महत्त्वाचे आहे निष्पाप व पैसा आणि नावलौकिक स्वार्थी हेतूने ज्ञानदानाचे कार्य करू शकलो नये स्वामी विवेकानंद यांच्या मते धर्म हा शिक्षणाचा खरा गाभा आहे व्यापक अशा सत्य धर्माची व्याख्या त्यांनी प्रस्तुत केली आहे धर्मातले सत्य म्हणजे बल होय म्हणजेच पुण्य होय दुर्बलता म्हणजे पाप होय अशा सोप्या शब्दात त्यांनी मानवी जीवनातील महत्त्व सत्याचे महत्व सत्याचे महत्व विशद केले आहे