नासा येवतीकर

Drama

3  

नासा येवतीकर

Drama

विश्वास

विश्वास

6 mins
427


विलास आणि सुहास हे दोघे बालपणीचे मित्र. एकाच ताटात खाल्लेले आणि एकाच छताखाली वाढलेले. विलासचे घर सुहासच्या घरापासून फार काही लांब नाही पण एक दोन घर संपले की त्याचे घर होते. विलासचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात कामाला जात असत. घरी दुसरे कोणी नव्हते म्हणून दिवसभर तो सुहासच्या घरी राहायचा. सुहासचे वडील एका सरकारी कार्यालयात कारकून होते. बऱ्यापैकी पगार होता आणि वरून रोजची कमाई वेगळी होती. त्यामुळे सुहासच्या घरात टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर, प्रिंटर, वॉशिंग मशीन यासारख्या चैनीच्या साऱ्या वस्तू होत्या. त्याने कोणतीही वस्तू मागितली की लगेच त्याला मिळत असे. आजपर्यंत त्याची कोणतीच हट्ट अपूर्ण राहिली नाही. सुहास त्याच्या बाबाला भीत असे मात्र आईच्या मदतीने तो आपले हट्ट पूर्ण करत असे. सुहासचे बाबा ऑफिस सुटल्यावर सुद्धा तेथेच बसून ओव्हरटाईम काम करत असत. रात्री दहा-अकरा वाजता घरी येत असत. सुहासची आणि त्याच्या बाबांची भेट आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी रविवारीच व्हायची. त्यादिवशी देखील त्याचे बाबा कधी कधी मित्रांच्या घरी पार्टी आहे म्हणून गेले की रात्री उशिरा परत येत असत. त्यामुळे सुहासला म्हणावे तसे बाबांचे प्रेम मिळालेच नाही.


इकडे विलासचे आई-बाबा दिवसरात्र शेतात काम करायचे आणि सायंकाळी आपल्या परिवारासोबत गप्पा मारत जेवण करायचे आणि झोपी जायचे. विलासच्या घरात पैसा आणि चैनीच्या वस्तूची कमी होती मात्र एकमेकांवरील प्रेम मुबलक होतं. त्यामुळे सुहासपेक्षा विलास नेहमी समाधानी आणि हास्य मुखाने बोलत असे. त्याचे ते आनंद पाहून कधी कधी विलास म्हणायचा, ' यार विलास, तुझ्याकडे पैसा नाही, टीव्ही नाही काहीच नाही तरी माझ्यापेक्षा तूच जास्त सुखी आहेस. सुखी राहण्यासाठी पैश्याची काहीच गरज नाही राव, कुटुंबात एकमेकांवर फक्त प्रेम राहावं आणि विश्वास राहावं. जे की तुझ्या कुटुंबात मला दिसते. माझ्याकडे सर्व राहून मी दुःखी आहे. नको मला असले जीवन ' असे तो बोलत असताना मनाने खूप खचून जायचा. त्याचे अभ्यासात मन लागायचे नाही.


विलासचा मात्र अभ्यास चांगला होता. सुहासचे सर्व पुस्तक, गाईड याचा वापर करत तो आपले शिक्षण पूर्ण करत होता. विलासच्या शिक्षणात सुहासची खूप मोलाची मदत होती. त्यांचा दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम ही होते आणि विश्वासदेखील होता. त्यांच्या मैत्रीची चर्चा संपूर्ण गावात आणि शाळेत प्रसिद्ध होती. त्यांच्याच शाळेत शिकणारी लता, जी की खूप सुंदर आणि मनमिळाऊ मनाची होती. ती सुहास आणि विलास यांच्यापेक्षा एका वर्गाने मागे होती. ती सर्वाना प्रेमाने आणि मैत्रीपूर्ण भावनेतून बोलायची. ती सुहास आणि विलास यांना देखील प्रेमळ बोलायची. मात्र सुहासच्या मनात लताविषयी वेगळे मत बनले होते. तो तिच्यावर मनातून प्रेम करायचा मात्र तो व्यक्त करू शकत नव्हता. विलासला सांगून तो हे काम करू शकला असता पण त्याने तसे केले नाही. असेच खेळीमेळीच्या वातावरणात हसत खेळत दिवस सरू लागले. दहावीची परीक्षा संपली आणि लता त्यांच्यापासून दूर झाली. आता लताचे दर्शन होणे देखील कठीण झाले होते. सुहास आणि विलास दहावी उत्तमरीत्या पास होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागले होते. येथेदेखील त्यांची मैत्री कायम होती. विलासच्या अडचणीत फक्त सुहास त्याला मदत करत होता. विलास अकरावी आणि बारावीच्या वर्गात खूप मन लावून अभ्यास केला आणि मेडिकलला प्रवेश मिळविला. तर सुहास मात्र या दोन वर्षात तेवढं अभ्यास न केल्याने त्याचा मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला कोठेही नंबर लागला नाही शेवटी तो त्याच कॉलेजमध्ये डिग्रीचे शिक्षण घेऊ लागला. 


दोन मित्रांची येथे ताटातूट झाली. तरी सुट्टीच्या काळात विलास घरी आला की सुहासची भेट घेतल्याशिवाय जात नव्हता. सुहासचे वडील एकदा ऑफिसात लाच घेतांना पकडले गेले आणि त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले. सुहासच्या घरची परिस्थिती एका वर्षात पार बदलून गेली. चैनीच्या वस्तू हळूहळू घरातून कमी होऊ लागले. घरातील पैसा संपू लागला. अपमान सहन न झाल्याने हार्टफेल होऊन सुहासचे वडील देवाघरी गेले. सुहासवर खूप मोठं संकट कोसळले होते. सुहासला कधी कष्ट करून माहीत नव्हते, फक्त पैसे उडविणे एवढंच माहीत होतं. त्याच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार पसरलेला होता. काय करावे सुचत नव्हतं? विलासला काही मित्रांच्या मदतीने सुहासच्या घरची सारी परिस्थिती कळाली. तात्काळ त्याने सुहासची भेट घेतली. परतफेड करण्याची ही योग्य वेळ आहे म्हणून विलासने अशा संकट काळात सुहासची खूप मदत केली. विलास तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या दवाखान्यात सरकारी डॉक्टर म्हणून काम पाहत होता आणि त्याला पाच आकडी पगार होता.


सुहासला कोणी काम देत नाही आणि त्याला देखील कोणते काम करवत नाही म्हणून त्याला शहरात बोलून घेतला. त्याला अपल्याजवळच ठेऊन घेतला. रोज फक्त काम बघत जा, काही करू नको. नंतर तुला काय करायचं आहे ते सांग असे म्हणून तो सुहासला रोज दवाखान्यात सोबत न्यायचा. दोन-चार महिने तेथील सर्व व्यवहार पाहून त्याने दवाखान्याच्या बाजूला एक हॉटेल टाकण्याचा निर्णय घेतला. दवाखान्यातील लोकांना खाण्याचे खूप त्रास होत होता, खुप दूरवरच्या अंतरावरून चहा, फराळ किंवा जेवण आणल्या जात होते. हीच कमतरता पूर्ण केल्यास लोकांची सोय होईल आणि आपले ही भले होईल. विलासला देखील त्याची आयडिया खूप आवडली. काही दिवसांत दवाखान्याच्या बाजूला मैत्र नावाचे हॉटेल चालू झाले. सुहास छानपैकी त्या व्यवसायात रमला होता, हॉटेल चांगले चालत होते आणि पैसा बऱ्यापैकी येऊ लागला होता. विलासच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असे सुहास म्हणायचा तर मी डॉक्टर झालो असतो की नाही माहीत नाही हे सारं सुहासच्या मैत्री आणि उपकारामुळे झालं असं विलास म्हणायचा. दोघांच्या मैत्रीची चर्चा त्या दवाखान्यातदेखील प्रसिद्ध झाली.


तसे दोघांचेही लग्नाचे वय झाले होते. विलाससाठी एक स्थळ बोलून आलं. त्याच्याच शाळेत शिकलेली आणि एक वर्ग मागे असलेली, प्रेमळ आणि सर्वांना मैत्रीपूर्ण बोलणारी लतासाठी विलासला मागणी आली. विलासने त्या स्थळाला होकार कळविला. ही बातमी त्याने आपला जिवलग मित्र सुहासला कळविला. सुहासला खूप आनंद झाला. बरे झाले आपण विलासला कधी सांगितलं नाही की लतावर माझे प्रेम आहे म्हणून. विलाससाठी लता योग्य आहे. असे आपल्या मनाची समजूत करत तो आपल्या कामात गुंग झाला. काही दिवसांनी साखरपुडा संपन्न झाला. या सोहळ्यात विलास आणि सुहासचे सारे वर्गमित्र हजर होते. सर्वांनी खूप धमाल मजा केली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र सुहास नेहमीसारखा आनंदी आणि सुखी वाटत नव्हता. विलासच्या डोळ्यांनी हे बरोबर हेरलं. काही तरी गुपित दडलेलं आहे, असे त्याला वाटू लागले. पण त्याला विचारणार कसे? साखरपुडा संपन्न झाल्यापासून सुहास विलासपासून दूर राहू लागला. याची जाणीव विलास होऊ लागली होती.


शाळेतील काही प्रसंग त्याने आठवण करण्याचा प्रयत्न केला. खूप खोलात जाऊन विचार करू लागला. असाच विचार करत करत तो आपली कार चालवत होता. त्याचक्षणी त्याला एक प्रसंग आठवला ज्यात सुहासने म्हटले होते की, लता खूपच छान आहे आणि मला खूप आवडते. पण त्यावेळी विलासने तेवढं मनावर घेतले नव्हते पण आता त्याला जरा लक्षात आले होते. याच विचारांच्या धुंदीत विलासचे रस्त्यावर लक्ष नव्हते आणि समोरून येणाऱ्या कंटेनरने त्याच्या कारला धडक दिली. चार-पाच फूट लांब फरफटत नेले होते, त्यात विलासला खूप जबर मार लागला होता. अपघाताची बातमी कळताच सुहास दवाखान्यात धावत पळत आला होता. आयसीयूमध्ये विलासला अशा अवस्थेत पाहून तो रडवेला झाला होता. सीटबेल्ट लावले होते म्हणून त्याचा जीव वाचला पण दोन्ही पाय मात्र कायमचे गमवावे लागले. काही दिवसांनी तो दवाखान्यातून आपल्या घरी परत आला. तो आता दिव्यांग झाला होता. लताविषयी रात्रभर विचार करत होता. शाळेत असताना सुहास लतावर खूप प्रेम करत होता आणि आता ही त्याचे खूप प्रेम आहे पण तो बोलून दाखवत नाही. मलाच काहीतरी करावं लागेल म्हणून तो दिवसरात्र विचार करत होता. शेवटी त्याने मनाचा पक्का निर्धार केला आणि लताच्या आई वडिलांना, सुहासच्या आईला आणि त्याच्या आईबाबांना बोलावून घेतलं आणि म्हणाला, 'आज मी एक निर्णय घेत आहे, कदाचित समाज त्यास चूकदेखील समजत असेल पण मला काही वाटत नाही, लतासोबत झालेला माझा साखरपुडा रद्द करून माझे लतासोबतचे लग्नही रद्द करावे. त्याऐवजी लताचे लग्न माझा मित्र सुहाससोबत लावून द्यावे, अशी माझी इच्छा आहे.' हे ऐकून सारेच अचंबित झाले.


सुहास म्हणाला, 'अरे विलास, तू काय बोलत आहेस? असा काही निर्णय घेऊ नको, मित्रा तू दिव्यांग झालास म्हणून लता काही तुला सोडून देत नाही आणि कोणी तसा विषयदेखील काढला नाही. तुझा जीव वाचला हेच आमच्यासाठी खूप आहे.' यावर विलास आपल्या जिवलग मित्र सुहासकडे पाहत म्हणाला, 'मित्रा, माझ्यापेक्षा लताला तू जास्त सुखी ठेवू शकतोस, कारण तू लतावर खूप प्रेम करतोस, मनातून प्रेम करतोस, शाळेत असल्यापासून तुला ती आवडते, हे मला खूप उशिरा समजले, त्यामुळे मला माफ कर, मित्रा.' त्याचे बोलणे ऐकून लता संभ्रम अवस्थेत असते. तिला काहीच कळत नाही काय बोलावे. पण विलास आपल्या मतावर ठाम राहतो आणि सुहास व लताचे मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा संपन्न होता. विलास आणि सुहास यांच्यात मैत्री तर होती त्याशिवाय एक गोष्ट होती ते म्हणजे विश्वास. एक शायर आपल्या शायरीत म्हणतो,


हाथो की लकीरो पर ऐतबार कर लेना

भरोसा हो तो हदो को पार कर लेना

खोना पाना तो नसीबो का खेल हैं

दिल जिसे अपना ले उसी से प्यार कर लेना


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama