विश्रांती
विश्रांती
सई एक गृहीणी होती. घरात सहा माणस. तिला रोजच सर्वांच कराव लागत. तीही दिवसभर कामातच तिचा वेळ जायचा. नवर्याच ऑफिस, मुलांची शाळा, सासु सासरे यांची जबाबदारी हे करताना जीव दमुन जायचा. पण एक गृहीणीला कधीही सुट्टी नसते. सई एक दिवस तापाने फणफणली होती. ती सकाळी उठूच शकत नव्हती. कोरोना मुळे राजेशच ऑफीसच काम ऑनलाईन सूरू होत. त्याला ही वेळ नसे. पण त्याला माहीती होत. सई आज बेल वाजली तरी उठत नाही आहे. त्याने तिच्या अंगाला हात लावला. तिला ताप होता. त्याने तिला गोळी दिली आणि आराम करायला लावला. ती ही झोपून गेली. लाॅकडाऊन मुळे मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या. राजेश आज लवकर उठला. त्याने किचनमध्ये आज पहिल्यांदा पाऊल ठेवल होत. सई त्याला प्रत्येक गोष्ट वेळेवर करून द्यायची. त्यामुळे त्याला यायची कधीही गरज पडली नाही. त्याला सर्व वस्तु शोधाव लागत होत्या पण त्याने ते केल. मुले आणि त्याचे आईबाबाही झोपलेले होते. त्याने सर्वांसाठी पोहे आणि चहा केला. आईबाबांना चहा दिला. तेव्हा त्यांनी विचारल, " अरे राजेश आज तु चक्क चहा केलास, काय झालय सई कुठे आहे ? त्याने तिला बर नाही. ताप आलाय सांगितल. तेव्हा आईने तिला हाॅस्पिटलला घेऊन जा सांगितल. कारण कोरोनाची साथ चालू आहे. डाॅक्टरांना दाखवलेल बर उगाच रिस्क नको." राजेशने हो म्हटल. त्याने मुलांना दुध बनवून दिल. आईबाबांनाही नाश्ता दिला. राजेशने चहा आणि गरमागरम पोहे सईसाठी तिच्या खोलित नेले. तेव्हा ति त्याला पाहुन उठली... " अहो, हे काय तुम्ही मला का नाही उठवल. खुप उशिर झालाय मला. " अग सई, थांब कुठे जात आहेस ?" मिच नाही उठवल मुद्दाम तुला. तुला बर नाही आज आणि तुला झोप लागली होती. " चल फ्रेश हो, नाश्ता कर आणि चहा घे. थोड बर वाटेल तुला. मग हाॅस्पिटलला जायचय तयारी कर तुझी. "
सईला आज खुप बर वाटल. राजेश किती काळजी करतात हे तिला दिसल होत. आज पहिल्यांदा त्याने केलेले पोहे आणि चहा ती घेत होती. तिला सगळ खुप छान लागल. त्याने तिला एक घास भरवला. त्याच्या बोलण्याने आणि इतक प्रेमाने सगळ करत होता तिचा निम्मा आजार बरा झाला होता. दोघांनी तयारी केली हाॅस्पिटला जाऊन आले. डाॅक्टरांनी कोरोना टेस्ट केली ती निगेटीव्ह आहे सांगितल. मेडीसिन आणि जेवण वेळवर करा आणी विश्रांती घ्यायला लावली. राजेशने घरी आल्यावर तिला आराम करायला लावला. तेव्हा सई राजेशला म्हणाली. " तुम्ही सकाळी माझ्यासाठी खुप केलत आता थोड बर वाटतय मी करेल " तेव्हा राजेश तिला म्हणाला. " तु आपल्या घरासाठी रोजच करत असते. मी तर आज केल फक्त तुला विश्रांती मिळावी म्हणून केल. आणि हो मी माझ काम सांभाळून दोन तीन दीवस हे अशी हेल्प करेल. तु फक्त आराम कर. सई बोलत होती पण ऐकेल तो राजेश कसला तो त्याच्या कामाला निघून गेला. सई बघत होती. लाॅकडाऊनमुळे राजेशमध्ये चांगला बदल झाला होता. त्याने ती आजारी असताना दोन दिवस तिला विश्रांती म्हणून किचनची जबाबदारी घेतली होती आणी आता तो तिला इतर गोष्टींत मदतही करत होता. घरातील मुलेही छान वागु लागली. तिला बर वाटल्यानंतर घरात एक छान बदल पाहायला मिळाला.