*"वीर सैनिक काय म्हणतो
*"वीर सैनिक काय म्हणतो


माझी प्रिय आई,
बाळाचा शतदा नमन, तू कशी आहेस? मला तुझी खुप आठवण येत असते. पण काही दिवसातच मी तुझ्या समोर असेन. हल्ली इकडे खुपच थंडी आहेस ग! तू विणलेल स्वेटर मी घालतोय. तुझ्या मायेची उब मला त्या थंडगार बर्फाळ प्रदेशात मिळते. इतक्या कापऱ्या थंडीत आपल्या देशाचे दुष्मन चोरून सरहद्द पार करतात. त्यांच्यावर पाळत ठेवावी लागत असते. कधी कधी हमला करुन पळून जातात. कधी कित्येक मैल चालून त्यांचा मागावर शोधत असतो. मी माझ्या गृपचा कमांडो असून सर्वात समोर मलाच रहाव लागत.काही ही अघटित घडू नये म्हणून चौकस राहून सैनिकांची मदत करणे, चौकशी करने, हे सर्व कार्य मी अतिशय जवाबदारीने करत असतो. त्यासाठी मला माझ्या मोठ्या साहेबांनी पदक बहाल केल,आणि वरुन पाठही थोपटली,आई मला तेंव्हा अतिशय आनंद झाला होता.
आता माझी ड्यूटी थेट बॉर्डरवर आहे. ही ड्यूटी निभावून सुट्टी मिळेल तेंव्हा मी घरी येऊन खूप गप्पा करेन. माझ्यासाठी तुम्ही जी मुलगी बघितली ना ती जयू, तिला मी बघितले होते, मी गावाला आलो असता. ती खूप लाजाळू होती, माझ्याकडे तिने पाहिल सुद्धा नाही,आणि लग्नाला होकार दिला, म्हणजेच मी आवडलोय ना तिला? मला तर ती आधीच आवडलेली होती. पण आई मी तुला सांगितलेच नव्हते, मग तुला कस माहित माझी आवड? तू ग्रेट आहेस ग, आई अगदी माझ्या सारखी.
आई आंधारात काहीतरी आवाज आला ग बघून घेतो एकदाचा नंतर पत्र पूर्ण करतोय.
आई आलोय फेरफटका मारुन. काहीच नव्हत. मी असल्यावर कोणाची हिम्मत होणार नाही बघ. आई परवाची घटना माझा मित्र कमांडो बेपत्ता आहे.असाच गेला होता फेरफटका मारायला, परत आलाच नाही. अजूनपर्यंत तपास चालू आहे. येईल तो नाही आला तरी देशासाठी लढून तो बलीदानी होईल.
"वीरांचा हा धर्म असतो लढणे"
"देशासाठी वीर गतिने मरणे"
आई माझे इथे बरेच मित्र आहेत.तु अजीबात काळजी करु नकोस.मी आल्यावर ना खुप प्रसंग सांगेन, तु माझ्या लग्नाची तयारी कर,मी आपल्या जवाबदारी पुर्ण करुन लगेच निघतोय. अररे, कन्हत नाही ग आई ,पायात अतिशय वेदना होते आहे.आई काय झाल ना चार दिवसा आधीची गोष्ट आहे, रात्री दुश्मनांनी फायरिंग केली.आम्ही पण सतर्क होतो. दुश्मनांना आम्हि खुप दुर पळवलं,आणि परत येत असतांना जमिनित पेरलेला बॉब फाटला त्यात मी जखमी झालोय.एका पायाची आणि हाताची त्वचा जळाली आहे. त्यात सारखी आग होते आहे. जास्त नाही ग आई, आग थोडी-थोडी होते आहे. काळजी करु नकोस इतक्या तितक्या जखमेला का कधी घाबरलोय मी? हो नां आई तुला माहित आहे ना मी लहान असतांना किती उनाड, खोडकर मुलगा होतो.खरच मी तुला खुप त्रास दिला नां आई.?
पण आता मुळीच त्रास देणार नाही. मी आता मोठा झालो नां ग आई, तुझा कुकूळ बाळ एक जॉबाज सिपाई झाला ना देशाचा? आई तुला गर्व आहेना माझ्यावर ? मला ना आई गर्व आहे. मी आपल्या देशासाठी काही करु शकतो ना? मरणे देशासाठी, जगणे ही देशासाठी. मी गेलो तरी असेण, या जगातल्या घटनेत जनमानसांच्या मनामनात राहिन. छे अस काय बोलतोय मी, यास मरण नाही म्हणत ग आई, याला" वीरगती" म्हणतात. शूरवीर जेंव्हा मरत असतात ना तेंव्हा त्यांना ,"अशोक चक्र" वाहिल्या जात. आणि ते अमर होतात' त्यांची "अमर गाथा" लिहिली जाते, त्यांना आपल्या देशाचा झेंडा
तिरंग्याचा कफन मिळतोय.
किती भाग्य लागत ना आई, अश्या वीर गतिला, किती सन्मान मिळतोय. जगात आलेला व्यक्ती तो एक दिवस जाणारच आहे.कोणी कश्याही पद्धतिने मरतो. कोणी बीमार होवून तर कोणी अँक्सिडंटने जातोय. पण त्या आणि या मृत्यूत फरक आहे. आपल्या देशासाठी जर काही करून मरण आलय तर त्याला वीरगती म्हणतात.
"देशार्थ देह झिजले ,हसुनी ज्या वीरांनी" ।
"शौर्याचा रंग केशरी ,त्यांची वदे कहाणी"।।
ही गोष्ट अगदी सत्य आहे आई ! रडून ही जातात हसुन ही जातात,मग हसुन देशासाठी आपला जीव ओवाळला तर त्यांची प्रत्येक जन्म सार्थक होतोय आणि त्यांचेवर आकाशातुन सुमंनाचा वर्षाव होतो,त्याचे नाव ना आई न "इतिहासातच " कोरले जातय.
"जयहिंद "आई जाव लागेल बोलवण आलय,दुष्मन जवळ आलेले आहेत.त्यांच्यावर फत्ते मिळवूनच येईन आई.आल्यावर लिहितो मी पत्रात समाचार प्रत्येक क्षणाचा,पण नाही आलो ना परत तर रागावू नकोस ग आई.
जय हिंद जय वंदे मातरम्!
तुझा लाडका
बाळ