वात्सल्य
वात्सल्य


एक हरिण नुकतच जन्मलेल्या पाडसाला न्याहाळत असताना, शिकारीच्या शोधात असलेला वाघ तिथे येतो.
वाघ येण्याची चाहूल लागताच ती वाघाला आपलं बाळ दिसू नये म्हणून त्याला हळूच झाडांमध्ये लपवते. आपल्या बाळाला शेवटचं पाहून ती विरुद्ध दिशेने धावत वाघाच लक्ष वेधून घेते आणि स्वतःच्या प्राणांची आहुती देते.
हॉस्पिटलमधल्या टीव्हीवर पाहिलेल्या दृश्याने स्वातीला वाघाच्या जागी आपल्या नवऱ्याला पाहत होती ज्याने आज तिला गर्भपात करण्यासाठी बळजबरीने आणलं होतं. हरिणीचे धाडस पाहून स्वातीच्या अंगात शक्ती संचारली, तिने हुशारीने डॉक्टर आणि नवऱ्याचे बोलणे रेकॉर्ड करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि आपल्या बाळाचे प्राण वाचविले.
वात्सल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, प्रत्येक आईचे आपल्या बाळाशी असलेलं मातृत्वाच नातं..