Anagha Dongaonkar

Abstract Tragedy

2.6  

Anagha Dongaonkar

Abstract Tragedy

वादळ

वादळ

6 mins
152


सकाळची सर्व काम आटोपून संजना शांततेनं झोपली होती. काही वेळाने तिला मोबाईलची रिंगटोनचा आवाज आला. तिने अनिच्छेने मोबाईल बघितला , तो अनोळखी नंबर होता. तिने तो कॉल रिसिव्ह केला नाही. परत तिला त्याच नंबरवरून कॉल येत होते. एकदा.. दोनदा.. तीनदा.. फोन वैतागून कट केला तरी... फोन येतच होता. थोडसं चिडूनच ती उठली आणि तिने भ्रुमणध्वनी हातात घेतला. आणि बोलू लागली , ' हॅलो कोण आहे ? कोण पाहिजे ? ' समोरून आवाज आला , ' अग तू संजना आहेस का ? ' ' हो , पण तुम्ही कोण ? मी ओळखलं नाही तुम्हाला. ' ती व्यक्ती आनंदाने एकदम रडायलाच लागली. ' अग.... अग... संजू किती दिवसांनी भेटलीस ... किती वर्षांनी बोलतोय आपण !' संजनाला आवाज ओळखीचा वाटत होता. पण काही केल्या ओळख लागत नव्हती. तिला समजतच नव्हतं की , ती कोणाशी बोलते आहे. अचानक समोरच्या व्यक्तीने तिचे नाव सांगितले , ' अग मी प्राजक्ता. ' हे नाव ऐकून संजनाच्या डोळ्यात आश्चर्याने आनंदाश्रू आले. डबडबलेल्या डोळ्यांनी त्या दोघी एकमेकींना बोलत होत्या. प्राजक्ता संजनाला म्हणाली , ' अग मी तुला व्हाट्सअप कॉल करते. पटकन रिसिव्ह कर. मला तुला पहायचं आहे. किती वर्ष झाले मी तुला पाहिले नाही. ' प्राजक्ताने एक क्षणही न दवडता व्हाट्सअप कॉल केला. आणि दोघी एकमेकांना बघून हर्षानंदाने रडायला लागल्या. त्यांनी खूप वर्षांनी एकमेकींना पाहिलं असल्याने तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. भावना अनावर होऊन दोघी एकमेकींना नूसत कितीतरी वेळ पहात राहिल्या. काही वेळाने भानावर आल्यावर संजना म्हणाली , ' कशी आहेस तू , इतके दिवस कुठे गायब होतीस !' बराच वेळ एकमेकींचा प्रश्नांचा मारा सुरू होता. जवळजवळ एक-दीड तास दोघिंचे बोलणे झाले. आणि मग फोन कट केला.

   संजना तशी शांत बसून राहिली. प्राजक्ताचाच विचार करत ती भुतकाळात सत्ताविस वर्ष मागे गेली. तिला तिच्या सहवासातील ते दिवस आठवले. प्राजक्ता सातवीत असताना तिच्या वर्गात आली. ती दिसायला सुंदर होती. थोडी आधुनिक होती. तिला पाहता क्षणी संजनाला आनंद झाला. संजनाला ती मैत्रीण म्हणून खूप आवडली. थोड्याच दिवसात दोघी खूप छान मैत्रिणी झाल्या.  एकेक दिवस कालचक्रानुसार पुढे सरकत होता. काही दिवसांच्या सोबतच संजनाच्या लक्षात यायला लागलं की , प्राजक्ता वरतून आनंदी दिसत असली तरी मनातून ती थोडीशी उदास नाराज आहे. नेमके कारण काय असेल हे तिला समजत नव्हते. तिला कधी विचारले तरी ' काही नाही ग , घरची आठवण येते , पण मी इथे आनंदी आहे. मावशी खूप काळजी घेते माझी. ' असे म्हणत प्राजक्ता ती गोष्ट हसत टाळायची. ती अभ्यासात हुशार असल्याने ती सर्व शिक्षकांची आवडती झाली. ती संजनाच्या घरी दुपारी येऊन अभ्यास करायची. ती मनमिळावू स्वभावामुळे तिच्या आईला आई , वडिलांना बाबा , भावाला भाऊ म्हणायची. अगदी थोड्याच दिवसात तिने मुलीचे स्थान तिथे प्राप्त केले.

  नेहमीसारख प्राजक्ता अशीच त्या दिवशीही अभ्यासाला घरी आली होती. खुप अस्वस्थ दिसत होती. अभ्यास करता करता रडत होती. संजनाला काय झाले हे कळत नव्हते. प्राजक्ता तशीच उठली आणि म्हणाली , ' मी घरी जाते दुसऱ्या. ' तिची ती अवस्था पाहून संजनालाही काही सुचत नव्हते. तिला थांबवायचे भानही नाही राहिले.   दुसऱ्या दिवशी सकाळीच संजनाच्या घरी पोलीस आले. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. की , पोलिस कसं काय आली ? संजनाला का विचारत आहेत. आईवडील , बहीणभाऊ सगळे घाबरून गेले. पोलिसांनी सांगितलं की, ' प्राजक्ताला तुम्ही ओळखता का ? ' प्राजक्ताच नाव घेतल्याने बाबा म्हणाले की , ' संजनाची जवळची मैत्रीण आहे. नेहमीच येते घरी. ' हे ऐकून ' काल प्राजक्ता तुमच्या घरी आली होती का ? ' असं पोलीसांनी विचारल्यावर सगळे गोंधळून गेले. कोणला काहीच समजत नव्हते की , नेमकं काय झालं आहे ? प्राजक्ताला काही झालं का ? की , आणखी काही झाल ? तिचा अपघात झाला ? काय झालं हे समजायला मार्ग नव्हता. पोलिसांना संजनाच्या वडीलांनी विचारलं , ' काय झालं साहेब ? ' तेव्हा त्यांनी सांगितलं की , ' प्राजक्ताने विहीरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ' हे ऐकून संजना जोरात रडायला लागली. पुढे पोलिस म्हणाले की , ' प्राजक्ताने तुझ्याजवळ एक चिट्ठी दिलेली आहे. ती तुझ्या दप्तरात असेल. ' ती बघण्यासाठी पळतच खोलीत गेली. आणि तिची बॅग आणली. ती पुस्तकांच्या पानांमध्ये चिठ्ठी शोधू लागली. ती चिठ्ठी सापडली. तिने ती पोलिसांना दिली. पोलिसांनी ती चिठ्ठी वाचली आणि संजनाला घेऊन ते दवाखान्यात गेले. तिथे प्राजक्ता आणि संजनाला अनेक प्रश्न पोलिसांनी विचारले. दोघींचाही वय लक्षात घेता संजनाच्या वडिलांनी विनंती केली. की , आता त्यांनी संजनाला जाऊ द्यावे.

  संजना तिच्या बाबांसह घरी आली. पण, तिला हे कळतच नव्हते की , प्राजक्ताने आत्महत्येचा प्रयत्न का केला ? तिने तिच्या आई-बाबांना ही विचारले. पण त्यांनीही कधी तिच्या या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. दिसांमागून दिवस , वर्षांमागून वर्ष गेले. आणि आज इतक्या वर्षांनी प्राजक्ता परत तिच्या समोर उभी होती. संजनाच्या मनात एक अपराधी भावना होती. तिला हे जाणून घ्यायचं होतं. की , प्राजक्ताने आत्महत्येचा प्रयत्न का‌ केला होता ? ती शाळा , अर्धवट शिक्षण सोडून आपल्या गावी , घरी का निघून गेली. शिक्षणासाठी म्हणून ती तिच्या मावशीकडे आलेली होती. तिच्या मनातील प्रश्न तिला शांत बसू देणार नव्हते. आणि दोन दिवसांनी तिने प्राजक्ताला फोन लावला. खूप हिम्मत करून गेली सत्तावीस वर्ष तिच्या मनात जे खदखदत होतं ते तीन तिला विचारण्याचे धाडस केले.    संजना प्राजक्ताला म्हणाली , ' प्राजू गेली सत्ताविस वर्षे एक प्रश्न माझ्या मनात सलतोय. त्याचे खरे खरे उत्तर देशील. ' प्राजक्ता म्हणाली , ' कोणता ग. ' ' तू आत्महत्येचा प्रयत्न का केला होतास ? हे ऐकून प्राजक्ता रडायला लागली. तिच्या जुन्या जखमा परत‌ ताज्या झाल्या. आणि तिने संजनाला वस्तूस्थिती सांगून टाकली. प्राजक्ता सामान्य परिस्थितीमध्ये जीवन जगत होती. तिला शिकायची आवड होती. पण घरची गरीबी तिच्या शिक्षणाच्या आड येत होती. म्हणून तिला शहरात तिच्या मावशीकडे शिक्षणासाठी ठेवले. तिची मावशी नौकरीला होती. त्या सकाळी लवकरच कामावर जात. प्राजक्ता तिच्या मावशिच्या दोन मुलांना सांभाळे , त्यांना तयार करून शाळेत पाठवून , घरची सगळी काम , स्वयंपाक करून शाळेत येत असे. तिचे काका घरीच असायचे. त्यांचा सुंदर आणि नुकतीच वयात येत असलेल्या प्राजक्ता डोळा हळू. नकळत्या त्या काकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हे तिने गपगुमान सहन केले ते केवू नात्यांची लाज राखण्यासाठी. त्यात तिचे वडील गरीब होते. तीने जर शिक्षण सोडलं तर ती पुढे शिकू शकणार नव्हती. हा बलात्कार सहन करण्या पलीकडे तिच्यासमोर दुसरा उपाय नसल्यामुळे ती मावशीच्या घरी राहत होती. पण एके दिवशी तिला आणि तिच्या काकांना तिच्या मावशिने बघितले. सगळा दोष तिलाच दिला. तिला वाटले आता मावशी आपल्या आई-बाबांना सगळं काही सांगेन. आपला काहीही गुन्हा नसताना आपण बदनाम होऊ. म्हणून तिने एक चिठ्ठी लिहिली. खरे तर ती संजनाला सर्वकाही त्या दिवशीच सांगणार होती. पण तिचे धाडस झाले नाही. तिने ती चिठ्ठी तिच्या नकळत गणिताच्या पुस्तकात ठेवली आणि निघून गेली.

    हे सर्व सांगताना त्या दोघेही रडत होत्या. इतक्या वर्षापासूनचे तिच्या मनातले वादळ आज कुठेतरी शमले होते. आणि संजनाच्या मनात तिने एक मोठे वादळ निर्माण करून ठेवले होते. आपल्या जिवलग मैत्रिणीला निरागस वयात काय काय सहन करावे लागले हे ऐकून तिला मानसिक धक्का बसला. ज्या वयात या गोष्टींचा दूर दूर पर्यंत संबंध ही नव्हता. या विषयाचा थांगपत्ताही नव्हता. तो विषय प्राजक्ता अनुभवत होती. हा विचार करून संजनालाच अपराधी असल्या सारखे वाटत होते. एक मैत्रीण म्हणून आपणच कुठेतरी कमी पडलो. काकांच्या रोजच्या अत्याचाराला कंटाळून तिने शेवटी तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आणि तिने आपल्या दप्तरात ठेवलेल्या चिठ्ठीमुळे आपण या सगळ्याची साक्षीदार झालो होतो. तिला हे समजले होते की , तिच्यापासून सगळ्या गोष्टी का दूर ठेवण्यात आल्या होत्या. तिने प्राजक्ताला माफी मागितली आणि दोघींच्याही मनातलं सत्ताविस वर्षांपूर्वी उठलेलं वादळ शांत झाले.                                                                                                


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract