STORYMIRROR

Anagha Dongaonkar

Others

3  

Anagha Dongaonkar

Others

कोण होतीस तू काय झालीस तू

कोण होतीस तू काय झालीस तू

2 mins
161

कॉलेजच्या रीयुनियन साठी सगळे मित्र-मैत्रिणी एका ठिकाणी जमले होते. सगळ्यांच्या नजरा पल्लवी कधी येते, याकडे लागल्या होत्या.

पल्लवी उच्चशिक्षित आधुनिक जगातली एम टेक ची डिग्री घेतलेली कॉलेजमधली टॉपर मुलगी. कॉलेजमधली सर्व मित्र मैत्रिणीची आवडती ,सगळ्या शिक्षकांची आवडती, सर्व गुणांनी संपन्न आणि कुठेही गेली तरी आपल्या व्यक्तिमत्वाने प्रत्येकाच्या मनावर छाप पाडणारी.

पल्लवी लग्नानंतर सर्व मित्र मैत्रिणीच्या कॉन्टॅक्टमध्ये कमी होती पण तिच्याबद्दल सगळीकडे चर्च होती, यामुळे सगळ्यांना पल्लवी कधी येते, याची सगळे जण वाट पाहत होते .

पल्लवीला येताना पाहिल्यावर सगळ्यांना शॉकच बसला. डोक्यावरचा पदर ,साडी, कपाळावर कुंकू, हातभर बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र हा तिचा अवतार पाहून, एक मुलगी अचानक अशी आणि इतकी कशी बदलू शकते.

हा विचार सगळ्यांना शांत बसू देत नव्हता . सगळ्यांना तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. काही मुलं-मुली तर तिला पाहून हसायला लागले. तिला पाहून सगळे हेच म्हणाले," काय होतीस तू आणि काय झालीस"?.

सगळ्यांना कुतुहूल आणि आश्चर्य या दोन्ही गोष्टी की पल्लवी ईतका बदल कसा झाला! सगळ्यांच्या प्रश्नाचा भडिमार झाल्यावर पल्लवी बोलू लागली.

नितीन पाटील हे गावाचे सरपंच फॉरेन रिटर्न उच्चशिक्षित त्यांच्यासोबत पल्लवीचे लग्न झालेले. उच्चशिक्षित नितीन पाच आकडी पगाराची नोकरी सोडून , आपल्या गावाच्या कल्याणासाठी गावात येऊन राहिला होता, त्याचबरोबरीने पल्लवी तेथे होती. नितीन हा गावाचा सरपंच त्यामुळे आपसूकच पल्लवी ही सरपंचची बायको, दोघ ही उच्चशिक्षित असले तरी गावात राहताना गाव हे रूढी-परंपरा जोपासणारे होते. सरपंच या नात्याने गावाच्या समस्या सोडवताना नितीनच्या कामात नितीनला पल्लवी मदत करत होती.

गावाला बदलायचं, लोकांना शिकवायचं, गावकऱ्यांच्या समस्या समजून घ्यायच्या असेल तर गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी मला त्यांच्यातील एक म्हणून त्यांच्या बरोबरीने मी राहिली तरच ते माझा स्वीकार करतील. न घाबरता, न संकोच ता त्यांच्या समस्या,अडीअडचणी माझ्यासोबत शेअर करतील. नितीनला याची मदत होईल. माझ्यासमोर ते आपल्या अडीअडचणी मांडतील तेव्हा कुठे मला त्यांचे योग्य तो कायापालट करून ,त्यांच्यातील उणिवा दूर करून गावाचा आणि त्यांचा विकास करता येईल. शिक्षणासोबतच संस्कार असतील आणि परंपरेचे पालन करून जर तुम्ही गावात बदल करून आणू शकत असाल तर कपडे ही फक्त वेशभूषा असू शकते. व्यक्तिमत्व आपण स्वतः तयार करत असतो. ती असते आपली प्रतिमा."

म्हणूनच माझ्यातला हा बदल मला सर्वांग दृष्टीने अनुरूप वाटतो आणि तसेही आपल्या भारत देशाची परंपरा आहे ,साधेपणात माणसाच सौंदर्य दिसून येतं. दिसणं महत्त्वाचं नसून माणसाचं असनं महत्वाचं असते . इतकं बोलून पल्लवी शांत झाली परत एकदा पल्लवीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने सर्व मित्र मैत्रिणींना भुरळ पाडली होती. पल्लवी गावकऱ्यांच्या मनामध्ये कर्तुत्व आणि गुणांनी एक प्रतिमा तयार केली होती त्याचीच आज सगळीकडे चर्चा होती.

# काय होतीस तू काय झालीस तू


Rate this content
Log in