गुलमोहर
गुलमोहर
- "गुलमोहराचे बहरणे.....
- संदर्भ एकच ..........
- वनवा होऊन जळताना ही पान टरा रून फुलण्याचा मनामनातील कणाकणात ही मृगधारा बनवून झरण्याचा" !
माझ्या घरासमोर गुलमोराच झाड दिवसेंदिवस बहरत चालेल,माझं मन मोहरून टाकतो गुलमोहर. नवीन आशा ,स्वप्न घेऊन येतात लाल चुटूक फुलं. मंतरल्यासारखी नुसतं पाहत रहावसं वाटतं त्या झाडाकडे, झाडामुळे आसपासच वातावरण एकदम प्रसन्न व नव्या उमेदीने भरल्यासारखे होते .मनावरची मळगळ झटकून टाकते ,जेव्हा जेव्हा मन उदास होत गुलमोहराची सोबत असते कितीतरी वेळ नुसतं पाहत राहते मनाची उदासीनता कुठल्या कुठे पळते . गुलमोहराच्या झाडाचं आणि माझं एक अनामिक नातं जुळत गेलं, जो तो गुलमोहराच्या झाडाकडे पाहून म्हणतो किती सुंदर झाड आहे नाही मला वाटतं बरं झालं ते माझ्या दारासमोर आहे .निसर्गाचा एवढ अनमोल सौंदर्य ते ही चैत्रात किती अद्भुत आहे ना? निसर्गाची लीला अगाध. गुलमोहरा सारखच मनाला उभारी देणारे, रक्तात तेज आणणारे पळस ही डोळे भरून पाहता येईल का?
