सोशल मीडिया
सोशल मीडिया
रियाच आज कामात लक्षच नव्हतं. तिच्या थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडचिड करणं, हे नेहाच्या कधीच लक्षात आलं .
नेहा आणि रिया दोघी एकाच ऑफिसमध्ये काम करत होत्या. लंच टाइम मध्ये नेहा शेवटी विचारलं ,काय झालं रिया? का इतकी चिडचिड करतेआहेस? आज तुझं कोणत्याच कामात लक्ष नाही आहे!
थोडीशी वैतागून आणि डोळ्यात पाणी आणून रिया ने नेहा जवळ आपलं मन मोकळं करायला सुरुवात केली. कित्येक दिवसापासून एक मुलगा तिला फेसबुक वर त्रास देत होता. त्याचे सततचे मेसेज तिला मानसिकरीत्या कमकुवत बनत होते, त्याचा ताण तिच्या घरादारावर, कामावर आणि तिच्या वैवाहिक जीवनावर पडत होता. शेवटी चिडून ती नेहाला म्हणाली" अगं बघ ना या मुलांना कोणीही चालतं 40 वर्षाची बाई असो नाहीतर लग्न झालेली असो, नाही तर सोळा वर्षाची असो, अगदी कोणीही ; समोर नसता तर काही ही बोलतील? कसाही त्रास देतील? सोशल मीडियाचा वैताग आला ग ,या मुळे असं वाटतं मोबाईल बंद करून द्यावा आणि फेकून द्यावा वापरच नकोच ,ना कोणतं टेन्शन! रोज उठून कसल्या कसल्या पोस्ट येतात. रोज उठून डोक्याला ताण होतो.
राजकीय ,सामाजिक, आर्थिक; रोज उठून आपणच आपला मोबाईल हाताळायचा आणि आपल्या डोक्याला टेन्शन करून घ्यायचं अस झालय ,नकोसा झालाय, आणि रोज किती जणांना उगीचच आपण उत्तर देत राहायचं ?कशासाठी? स्वतःला स्वतःच आपल आयुष्य नाही आहे का? सोशल मीडिया वापरतात, समोरच्याला वाटतं सगळं आयुष्य सोशल आहे.
काही , तयारच असतात आली ऑनलाइन कि विचार काय करतेस ?काय जेवलीस का? काय खाल्ल? यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आपण ऑनलाईन येतो का? आपण आपलं जीवन नाही जगू शकत का? सहज म्हणून मैत्री करायला गेली आणि हा गळ्यातच पडतोय, त्याला सांगितलं माझं लग्न झालेला आहे. मला दोन मुलंआहेत तरीही ऐकायला तयार नाही. अगदी नकोसा करून ठेवलाय जीव बघ ना!
रिया सोशल मीडिया तुझा, व्हाट्सअप फेसबुक , मोबाईल तुझा ना? सोशल मीडिया तुझं ? पटकन सोशल मीडियावर त्याला ब्लॉक कर आणि तू तुझ्या कामाला लाग .सोशल मीडियाचा वापर करतेस मग तो व वापर योग्य की अयोग्य हे तुला कसं नाही समजत ग इतकी कशी तू मोबाईलचा आहारी गेलीस ?
आपण आपलं योग्य वापर केला तर त्रास नाही होणार. नेहा रियाला समजावत होती .सोशल मीडिया म्हणजे हवीशी अवजड बेडी आहे बघ, सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकून न पडता त्याचा योग्य वापर केला तर सोशल मीडिया काय वाईट आहे? सोशल मीडिया हे एक माध्यम आहे आणि कोणत्याही माध्यमे वाईट कसं असु शकतं? त्याचा वापर आपण कसा करायचा योग्य की अयोग्य हे आपण आपले ठरवायचं, सोशल मीडियाचा वापर करून अनेक जणांचे आयुष्य घडले आहे तर कितीतरी जण स्वतःला या सोशल मीडियामुळे हरवून पण बसलेले आहेत .खरं तर आपल्याला माहीत असत की, काय? कसा वापर करत आहे; योग्य-अयोग्य आपलं मन आपल्याला नेहमी सांगत असते की आपण चुकत आहोत. तरी आपण सोशल मीडियाच्या मोहाला बळी पडून समजत असूनही काही गोष्टी करत असतो. त्या आपण थांबवत नाही हीच सगळ्यात मोठी चूक आहे बघ.सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर समाजात किती मोठी क्रांती घडून येईल त्या सोशल मीडियामुळे समाजात कवी, चित्रकार, वक्ता, गायक शिक्षक वैज्ञानिक संगीतकार तयार होतात .इतकच काय अगं योग्य वर वधू साठी शादी डॉट कॉम साईट पण आहेच ना!
रिया तू विसरते आहेस का? तू आणि मी दोघी मॉम्स प्रेसो वर किती छान लेख लिहितो, किती सुंदर ब्लॉग लिहितो, बाकीचे सगळेजण, आपण किती सुंदर लिहितात ,आपले विचार मांडतात हे सगळेच सोशल मीडियामुळे होत आहे ना मग वैतागून कस चालेल.
सोशल मीडिया म्हणजे हवीशी वाटणारी अवजड बेडी आहे आलं का वेडाबाई लक्षात काही? फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर याशिवाय आपला आयुष्य आजकाल चालतच नाही ,सोशल मीडिया ची ही साधना असली तरीही त्याचा योग्य वापर केला तर आपल्या जीवनात ती सकारात्मकता नक्कीच घेऊन येतील व्हाट्सअप मुळे फेसबुक मुळे दूर गेलेले मित्र मैत्रीण आपल्याला भेटले दूर असलेले नातेवाईक त्यांची विचारपूस आपण सहजरीत्या करू शकतो ,एखाद्याचे कौतुक हे पण किती सहजरीत्या करू शकतो. आपण आज सोशल मीडियामुळे एकमेकांपर्यंत आपले मनोगत पोहोचू शकतो.
आता काही लोकं सामाजिक कर्तव्याची जाण विसरून सोशल मीडिया ला बळी पडतात तर सोशल मीडियाला त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाच्या आपल्या विचारशक्तीवर अवलंबून आहे .विश्वाचे चाहो दिशा चे चांगले विचार आपल्यापर्यंत येऊन घेऊन येणारे सोशल मीडिया ही कशी वाईट असणार. सकारात्मक जर वापर केला तर शैक्षणिक, ई-लर्निंग या वापराने सोशल मीडिया किती योग्य आहे हे आज आपल्याला माहित पड़त प आहे .लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असल्या तरी मुलांच्या शैक्षणिक शिक्षण सुरू आहे .आपण घरात बसलो आहे तरी आपले विचार आपण समाजापर्यंत लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमापासून पोहोचू शकतो.
येडाबाई आता मूड चांगला कर आणि काम कर खूप काम पडलीत आणि हो ही सोशल मीडिया ची हविशी अवजड बेडी सोबत घेऊनच आपल्याला आपली काम करायची आहेत. सोशल मीडिया हा विषय न संपणारा आहे आपण थांबू आणी कामाला लागू ,असं म्हणत दोघींनी ही जोरदार हसून मोबाईल हातात घेतले आणि कामाला लागल्या.अशी ही नकोशी पण हवी शी अवजड बेड़ी म्हणजे सोशल मीडिया.
